Breking News
फुलेप्रेमी कवीच्या कुटुंबाला तीन लाखांची आर्थिक मदतपुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

ज्येष्ठ महिलेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

पाषाण रस्त्यावरील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या प्रवेशद्वारासमोर घडली घटना

marathinews24.com

पुणे – फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या ज्येष्ठ महिलेचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना पाषाण रस्त्यावरील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या प्रवेशद्वारासमोर शनिवारी सायंकाळी घडली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहन चालक पसार झाला.आशा विजयकुमार पाटील (वय ७३, रा. अभिमानश्री हाऊसिंग सोसायटी, पाषाण रस्ता ) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याबाबत अतुल विजयकुमार पाटील (वय ५२) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीनांकडून एकावर शस्त्राने वार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा पाटील दररोज सायंकाळी घरातून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडायच्या. शनिवारी (२४ जानेवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्या पाषाण रस्त्यावरुन निघाल्या होत्या. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) प्रवेशद्वारासमोर भरधाव वाहनाने पाटील यांना धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. पाटील यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. उपचारांपूर्वीच पाटील यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक धस तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×