उपाहारगृहातील रोखपालाकडून रोकड लंपास

पुण्यात पीमपी वाहक महिलेवर चाकूने वार

रोखपालाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बंडगार्डन रस्त्यावर असलेल्या एका उपाहारगृहातील रोखपालाने गल्ल्यातील एक लाख रुपयांची रोकड चोरल्याची घटना उघडकीस आली. याबाबत उपाहारगृह मालकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रोखपालाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहनावर ट्रक आदळून चालकाचा मृत्यू – सविस्तर बातमी – 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे बंडगार्डन रस्त्यावर उपाहारगृह आहे. आरोपी त्यांच्यकडे रोखपाल म्हणून काम करत होता. आरोपीने लक्ष नसल्याची संधी साधून वेळोवेळी एक लाख रुपयांची रोकड चोरल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करत आहेत.

दवाखान्यातून एक लाख ६० हजारांची रोकड चोरी

शुक्रवार पेठेतील साठे काॅलनी परिसरात असलेल्या एका खासगी दवाखान्यातून चोरट्यांनी एक लाख ६० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका डाॅक्टरांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदारा हे दंतवैद्यक तज्ज्ञ आहेत. चोरट्यांनी दवाखान्यातील खिडकीतून आत प्रवेश केला. दवाखान्यातील कपाटात ठेवलेली एक लाख ६० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत असून, पोलीस हवालदार हर्षल दुडम तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×