पार्क केलेल्या कारच्या डिक्कीतून रोकड चोरली

पार्क केलेल्या कारच्या डिक्कीतून रोकड चोरली

येरवडा पोलिस ठाण्यात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील कल्याणीनगर परिसरात पार्क केलेल्या कारच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्यांनी ३० हजारांची रोकड तसेच कागदपत्रे चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ५५ वर्षीय व्यक्तीने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोद केला आहे. हा प्रकार दोन दिवसांपुर्वी भरदुपारी अडीचच्या सुमारास घडला आहे.

पिस्तूलातून झालेल्या गोळीबारात अल्पवयीन जखमी – सविस्तर बातमी 

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे कल्याणीनगर भागात राहण्यास आहेत. त्यांनी त्यांची कार लेन नंबर ६ मध्ये पार्क केलेली होती. कारच्या डिक्कीत दोन लेदरच्या बॅग व त्यात ३० हजारांची रोकड होती. तर काही कागदपत्रेही होती. अज्ञात चोरट्यांनी त्याच्या डिक्की कशाच्यातरी सहाय्याने उघडून त्यातून या वस्तू चोरून नेल्या. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक फंटागरे हे करत आहेत.

ट्रॅव्हल्स आरटीओकडे नोंदणी न करता रस्त्यावर

प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आरटीओ) ट्रॅव्हल्सची नोंदणी न करता दुसऱ्या बसचा क्रमांक लावून ती रस्त्यावर आणल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात ३० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, एका व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. हडपसरमधील रविदर्शन चौकात हा प्रकार उघडकीस आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×