Breking News
Akshaya Patra Foundation Pune : पुण्यात दररोज १० हजार विद्यार्थ्यांना अक्षय पात्रकडून मध्यान्ह भोजनPune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्ण

गुन्हेगारी

स्पोर्टस बाईकवरून सोनसाखळी हिसकावणार्‍या सराईताला बेड्या ८ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस, रांजणगावसह एलसीबी पथकाची कामगिरी पुणे- पाण्याची बाटली विकत घेण्याच्या बहाण्याने महिलांच्या गळयातील मंगळसुत्र हिसकावून नेणार्‍या अट्टल चोरट्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या रांजणगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून ८ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून, तब्बल १० लाख १० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मारुती ऊर्फ गोविंद रामनाथ आंधळे (वय ३८ रा लिंबोडी पोस्ट देवीनिमगाव ता आष्टी जि बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार शरद बापु पवार (रा लोणी सय्यदमीर ता आष्टी) पसार आहे. याप्रकरणी वंदना रोहिदास शेटे (वय ३३ रा. पिंपरी दुमाला ता शिरुर पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वंदना शेटे २५ मार्चला रांजणगाव गणपती चौकातील धनगरवाडा स्नॅक्स सेंटरमध्ये होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघाजणांनी पाण्याची बाटली खरेदीच्या बहाण्याने वंदनाला ५० रूपये दिले. त्यानंतर उर्वरित पैसे देत असताना आरोपींनी महिलेच्या गळ्यातील ११ गॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेले. याप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हयांचा तपास स्थानिक गुन्हे शाखा तसेच रांजणगाव पोलीस करीत होते. घटनास्थळांवरील सी सी टि व्हि फुटेज तपासुन चोरटयांनी गुन्हा करताना स्पोर्टबाईक वापरली होती. दरम्यानच्या काळात शिरुर, शिक्रापुर, चाकण, आळंदीसह अहिल्यानगर जिल्हयातील कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच पद्धतीने गुन्हे झाले होते. परिसरातील मार्गावर १० दिवसांपासुन स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलीसांनी संयुक्तरीत्या सापळे रचले. परंतु आरोपी हे वारंवार चकवा देत होते. घटनास्थळापासुन ते बीड जिल्हयापर्यत सुमारे ३०० ते ३५० कॅमेरे तपासले. संबंधित गुन्हा मारुती ऊर्फ गोविंद आंधळे आणि शरद बापु पवार यांनी केल्याचे स्पष्ट झाले. आरोपी आंधळे हा अहिल्यानगर ते शिरूरला स्पोर्टस बाईकवरुन येणार असल्याची माहिती अमंलदार उमेश कुतवळ यांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी शिरुर हददीत सतरा कमान पुलाच्या अलीकडे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, एपीआय दत्ताजीराव मोहिते, एपीआय कुलदिप संकपाळ, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजु जाधव, योगेश नागरगोजे, सागर धुमाळ, थोरात, दत्ता शिंदे, उमेश कुतवळ, योगेश गुंड, संतोष सांळुखे, खरबस, साळवे यांनी केली. *८ गुन्हे उघडकीस, १० तोळे सोने जप्त* स्पोर्टस बाईकवरून प्रवास करीत आरोपींनी शिरुर, शिक्रापुर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चाकण, आळंदी देवाची, अहिल्यानगर जिल्हयातील कर्जत परिसरात गुन्हा केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याकडून गुन्हयात वापरलेली दुचाकी, ८ गुन्हयातील १० तोळे २०० मिली गॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा १० लाख १० हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
गुन्हेगारी

पावसामध्ये चमकलेल्या विजेच्या प्रकाशावरुन खुनाची उकल

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी marathinews24.com पुणे – पावसामध्ये चमकलेल्या वीजेच्या प्रकाशातून भारती विद्यापीठ पोलिसांनी महिलेच्या खुनाची उकल केली आहे. याप्रकरणी […]

स्मार्ट ई-बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
गुन्हेगारी

स्मार्ट ई-बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

आता कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट ई-बस धावणार  marathinews24.com पुणे – कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली

Pune Cyber Crime
गुन्हेगारी

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ४७ लाखांची फसवणूक

जास्त परतावा देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी केली फसवणूक  marathinews24.com पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी कोथरूड भागातील महिलेची

Payal Zambre Suicide Case
गुन्हेगारी

सोसायटीमधील ७ दुचाकी पेटविणारा सराइत अटकेत

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिली होती फिर्याद marathinews24.com पुणे – सोसायटीच्या आवारातील ७ दुचाकी पेटवून देऊन पसार झालेल्या सराइताला गुन्हे

पुणे : व्यावसायिकाला मारहाण करणारे अटकेत
गुन्हेगारी

पुणे : व्यावसायिकाला मारहाण करणारे अटकेत

गुन्हे शाखा युनिट तीन आणि वारजे पोलिसांच्या पथकाची कारवाई marathinews24.com पुणे – व्यावसायिकाला मारहाण करून पसार झालेल्या सराइतांना पोलिसांनी पकडले

मोटार चालकाची मुजाेरी; अपघातानंतर एकाला फरफटत नेले
गुन्हेगारी

मोटार चालकाची मुजाेरी; अपघातानंतर एकाला फरफटत नेले

पाेलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न marathinews24.com पुणे– खराडी बायपास चौकात भरधाव मोटारीने एका मोटारीला धडक दिली. अपघातानंतर पसार होण्याच्या

गावठी दारू विक्री प्रकरणात दोघे अटकेत
गुन्हेगारी

गावठी दारू विक्री प्रकरणात दोघे अटकेत

महंमदवाडी भागात गावठी दारू विक्री – पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात  marathinews24.com पुणे – गावठी दारू विक्री प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक

पुण्यातील कथित आरटीआय कार्यकर्ता ललित ससाणेविरुद्ध गुन्हा दाखल
गुन्हेगारी

पुण्यातील कथित आरटीआय कार्यकर्ता ललित ससाणेविरुद्ध गुन्हा दाखल

पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती दिल्याचा प्रकार marathinews24.com पुणे – पोलीस दलातील अधिकाऱ्यांवर आरोप करणे, बनावट स्वाक्षरींचे निवेदन तयार करून

टेम्पोतील ५०० किलो तारांचे बंडल चोरले, टोळीला अटक
गुन्हेगारी

टेम्पोतील ५०० किलो तारांचे बंडल चोरले, टोळीला अटक

लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी marathinews24.com पुणे, दि. ११ (प्रतिनिधी)- पार्विंâगमधील टेम्पोतून तब्बल ५०० किलो वजनाचे तारांचे बंडल चोरणार्‍या टोळीला लोणी

लग्नाचं स्वप्न पडलं महागात...
गुन्हेगारी

लग्नाच्या आमिषाने तरूणीची फसवणूक, ८ लाखांना गंडा

येरवडा परिसरात घटना  marathinews24.com पुणे – डिव्हॉर्स मेट्रोमोनी साईटवरून झालेली ओळख तरूणीला महागात पडली असून, लग्नाची बतावणी करीत एकाने तिला

error: Content is protected !!
Scroll to Top
×