Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

पुण्यातील कथित आरटीआय कार्यकर्ता ललित ससाणेविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यातील कथित आरटीआय कार्यकर्ता ललित ससाणेविरुद्ध गुन्हा दाखल

पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती दिल्याचा प्रकार

marathinews24.com

पुणे – पोलीस दलातील अधिकाऱ्यांवर आरोप करणे, बनावट स्वाक्षरींचे निवेदन तयार करून सोशल मीडियावर पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या कथित माहिती अधिकार कार्यकर्ता सराइत गुंड ललित ससाणेविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ससाणेविरुद्ध गंभीर स्वरुपाचे ६ गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती खडक पोलिसांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण (वय ५३) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ललित ससाणेविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २१२, २१७, २२४, तसेच पोलस ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ट्रकचालकाने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, एकजण जखमी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित ससाणे महात्मा फुले पेठेतील लोहियानगर परिसरात राहायला आहे. ससाणेने पोलीस दलाची प्रतिमा मलीन होईल, असे प्रयत्न केले. त्याने खोटे गुन्हे दाखल केल्याचे नागरिकांना सांगितले होते. नागरिकांची बनावट स्वाक्षरी घेऊन त्याने निवेदन तयार केले. संबंधित निवेदन त्याने सोशल मीडियावर प्रसारित केले होते, असे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

पोलीस दलाची बदनामी, तसेच प्रतिमा मलीन करण्यासाठी तो जाणीवपूर्वक प्रयत्न करत होता. तीन दिवसांपूर्वी पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून दोन व्यक्ती लोहियानगर येथून माझा पाठलाग करत आहेत असे सांगितले. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण मला मारहाण करणार आहेत. मला मदत हवी आहे, अशी खोटी माहिती त्याने नियंत्रण कक्षाला दिली होती. या घटनेनंतर दोन गस्त घालणारे दोन पोलीस कर्मचारी तेथे पाेहाेचले. तेव्हा ससाणेने मी रुग्णालयात निघालो असून, पोलीस चौकीत नंतर तक्रार देतो, असे सांगितले.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज लोंढे यांनी ससाणेची चौकशी केली. माझ्या जिवाला धोका असून, पोलीस निरीक्षक चव्हाण माझ्या मागावर आहेत, असे त्याने सांगितले. ज्या दिवशी ही घटना घडली. तेव्हा पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण साप्ताहिक सुटी असल्याने घरी होते. ससाणेने पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करुन खोटी माहिती दिली. चौकशीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ससाणेविरुद्ध गुन्हा दाखल केला. ससाणे हा लोहियानगर भागात माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून वावरतो. त्याच्याविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह ६ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती खडक पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×