Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

ट्रकचालकाने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, एकजण जखमी

ट्रकचालकाने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, एकजण जखमी

गंगाधाम चौकात भीषण अपघात

marathinews24.com

पुणे – सिग्नल सुटल्यानंतर ट्रक चालकाने दुचाकीस्वाराला धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीस्वार चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. हा अपघात बुधवारी (दि. ११) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास मार्केटयार्ड परिसरातील गंगाधाम चौकात घडला आहे.

टेम्पोतील ५०० किलो तारांचे बंडल चोरले, टोळीला अटक – सविस्तर बातमी 

मार्केटयार्ड पोलिसांनी ट्रकचालक शौकत आली पापालाल कुलकुंडी (वय ५१, रा. भवानी पेठ, पुणे) याला ताब्यात घेतले आहे. अपघातात दीपाली युवराज सोनी (वय २९) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. जगदीश पन्नालाल सोनी (वय ६१) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सोनी कुटूंबिय हे ११ जूनला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास गंगाधाम चौकात थांबले होते. सिग्नल मिळाल्यानंतर ते मार्गस्थ होताना पाठीमागून आलेल्या ट्रकचालकाने सोनी कुटूंबियाला धडक दिली.

त्यामुळे दीपाली आणि जगदीश दोघेही चाकाखाली सापडले. ट्रकचे (एमएच १४ एएस ८८५२) चाक दीपालीच्या डोक्यावरून गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला असून, जगदीशही गंभीररित्या जखमी झाले आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मदतकार्य राबविले. दरम्यान, मध्यवर्ती भागात सातत्याने अवजड वाहन चालकांकडून अपघात घडत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

अपघाताच्या दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक पोलीस आणि पुणे महानगरपालिकेच्या समन्वयाने कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना बंदी असतानाही त्यांच्याकडून उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी संबंधिताविरूद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. – डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ चार, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×