Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

लग्नाच्या आमिषाने तरूणीची फसवणूक, ८ लाखांना गंडा

लग्नाचं स्वप्न पडलं महागात...

येरवडा परिसरात घटना 
marathinews24.com

पुणे – डिव्हॉर्स मेट्रोमोनी साईटवरून झालेली ओळख तरूणीला महागात पडली असून, लग्नाची बतावणी करीत एकाने तिला तब्बल ८ लाख ३५ हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना एप्रिल ते २ जून कालावधीत येरवडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय तरूणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोबाइल धारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

डेटींग अ‍ॅपवरील ओळख पडली महागात, तरूणाला लुटले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूणीची एप्रिल २०२५ मध्ये डिव्हार्स मेट्रोमोनी वेबसाईटवरून आरोपीची ओळख झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या चॅटींग झाल्यानंतर आरोपीने तरूणीसोबत लग्न करणार असल्याची बतावणी केली. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत गप्पा मारल्या. त्यानंतर तरूणीला भेटण्यासाठी आरोपी दिल्लीतून पुण्याला येत असताना त्याला पोलिसांनी मनी लॉड्रींगच्या केसमध्ये पकडून ठेवल्याचे सांगितले.

त्यासाठी त्याने तक्रारदार तरूणीला काही पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार तरूणीने वेळोवेळी ८ लाख ३५ हजार रूपये संबंधिताच्या बँकखात्यात वर्ग केले होते. मात्र, त्याने तिला भेटण्यासाठी न येता आर्थिंक फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवकाते तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×