Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

डेटींग अ‍ॅपवरील ओळख पडली महागात, तरूणाला लुटले

डेटींग अ‍ॅपवरील ओळख पडली महागात, तरूणाला लुटले

शस्त्राचा धाक दाखवून ६० हजार ऑनलाईनरित्या काढून घेतले

marathinews24.com

पुणे – डेटींग अ‍ॅपवरील ओळख तरूणाला महागात पडली असून, टोळक्याने त्यांना मिटींगसाठी बोलावून घेत बेदम मारहाण केली. त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवून ऑनलाईनरित्या ६० हजार रूपये वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी एका आरोपीला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ९ जूनला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मंगळवार पेठेतील जुना बाजार परिसरात घडली आहे.

पोलिस असल्याचे भासवून जेष्ठ महिलेला लुटले – सविस्तर बातमी 

वाहिद रज्जाक शेख (वय १९ रा. जुना बाजार, मंगळवार पेठ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार शाहिद शेख (वय २२) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो पसार झाला आहे. याप्रकरणी अनिल पदमसिंग सोळंकी (वय ३३ रा. नारायण पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनिल हे नारायण पेठेत राहायला असून, त्यांनी मोबाइलमध्ये वाल्ला अ‍ॅप डाउनलोड केले होते. संबंधित अ‍ॅप डेटींग आणि मिटींगसह चॅटींगसाठी वापरले जाते. त्या अ‍ॅपद्वारे अनिलची आरोपींसोबत ओळख झाली होती. त्यानंतर आरोपींनी त्यांना भेटण्यासाठी मंगळवार पेठेतील जुना बाजार परिसरात बोलावले होते. अनिल त्याठिकाणी गेले असता, आरोपींनी त्यांना शस्त्राचा धाक दाखविला. त्यांचा मोबाइल जबरदस्तीने हिसकावून घेत शिवीगाळ केली.

मोबाइलमधील फोन पेचा पासवर्ड विचारून अनिलच्या बँकखात्यातून ६० हजार रूपये वर्ग करून घेत फसवणूक केली. याप्रकरणी अनिलने पोलीस चौकीत धाव घेत घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक शीतल जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×