Breking News
पावसामुळे १३ ठिकाणी झाडे पडलीकुंडमळा येथे वेगवान बचावकार्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यशपिस्तूल बाळगणार्‍या तिघांना बेड्या, ३ पिस्तूल ९ काडतुसे जप्तनिघोजे येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजराशाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागतपीएमपीएल बसप्रवासात जेष्ठाचे चैन चोरीलातरुणाला शेअर ट्रेडींगचा परतावा पडला १९ लाखांना…शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागतआरटीओ ट्राफिक चलनाच्या नावाखाली लुटले ७ लाखफ्लॅटचे कुलूप तोडून ३९ लाखांचा ऐवज लांबविला

पोलिस असल्याचे भासवून जेष्ठ महिलेला लुटले

 पोलिस असल्याचे भासवून जेष्ठ महिलेला लुटले

वारजेतील घटना, सव्वा सहा लाखांचे दागिने लुबाडले

marathinews24.comn

पुणे – मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या जेष्ठ महिलेचा पाठलाग करून दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करीत हातचलाखीने तब्बल ६ लाख २४ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेले आहेत. ही घटना १० जूनला संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वारजेतील अविस्मरा हॉलजवळ घडली आहे. याप्रकरणी सुहासिनी सुरेश कुलकणा (वय ६४) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा माग काढण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

धनकवडीमध्ये कोयता गँगचा राडा, तरूणावर केला वार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कुलकर्णी वारजेतील महालक्ष्मी नगर सोसायटीमध्ये राहायला आहेत. नेहमीप्रमाणे १० जूनला संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्या मंदिरात दर्शनासाठी जात होत्या. अभिमन हॉलजवळ पोहोचताच, एकाने त्यांना गाठले. आजी जवळच एक खून झाला आहे, अशी बतावणी केली. ते बाजूला असलेले आणि मी पोलीस असून, तुमची काळजी घेणे आमची जबाबदारी आहे असे म्हटले. तुमच्याकडील सर्व दागिने बॅगेत ठेवावे लागतील असे सांगितले. भीतीमुळे कुलकर्णी यांनी गळ्यातील सोन्याची चेन, मंगळसूत्र आणि चार सोन्याच्या बांगड्या काढून बॅगेत ठेवायचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्यांनी त्यांना मदतीच्या बहाण्याने हातचलाखीने दुसर्‍या पिशवीत दागिने पिशवीत ठेवले.

दागिन्यांची पिशवी घेउन कुलकर्णी मंदीरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यानंतर काही वेळाने दागिने घेण्यासाठी त्यांनी पिशवीची तपासणी केली असता, दागिने मिळून आले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुलकर्णी यांनी तातडीने वारजे माळवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये २ लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र, सव्वा लाख रूपये किमतीची चैन, ३ लाख रूपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या असा ६ लाख २४ हजारांचा ऐवजाचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी ताब्यात घेतले आहे. त्यानुसार आरोपींचा माग काढण्यात येत असल्याची माहिती वारजे पोलिसांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top