Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

धनकवडीमध्ये कोयता गँगचा राडा, तरूणावर केला वार

आम्ही या भागातील भाई म्हणत हवेत फिरवला कोयता

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात कोयता गँगने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ कारणासह परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी टोळीकडून शस्त्रास्त्र हवेत फिरविली जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारजे माळवाडीत सलग दोन घटना नुकत्याच घडल्या होत्या. त्यानंतर आता सहकारनगर परिसरातील धनकवडीत कोयता गँगने तरूणावर कुर्‍हाडीने हल्ला करून गंभीररित्या जखमी केले आहे.

सराईत आंदेकरविरुद्ध आणखी दोन गुन्हे दाखल – सविस्तर बातमी

बाबा मालुसरे, संकेत कसबे आणि सोहम सोनार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. नितेश विनोद गायकवाड (वय १८) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. टोळक्याने आम्ही या भागातील भाई असल्याचे सांगत नितेशवर कोयत्याने हल्ला करून गंभीररित्या जखमी केले आहेत.

त्यानंतर टोळक्याने कोयत्याच्या धाकाने संपूर्ण परिसरात दहशत माजविली आहे. ही घटना १० जून रोजी रात्री गोविंद पाटील नगरमध्ये घडली. हल्ल्यात जखमी तरुणाला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध खुनी हल्ला, शिवीगाळ, भीती पसरवणे यासारख्या गंभीर कलमांखाली सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार नितेश विनोद गायकवाड (वय १८) हा १० जूनला रात्री आठच्या सुमारास त्याच्या घराबाहेर बसला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या बाबा मालुसरे, संकेत कसबे आणि सोहम सोनार यांनी नितेशला विनाकारण शिवीगाळ करीत मारहाण केली. नितेशने त्यांना प्रतिकार केला असता, तिघांनी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी सोहम सोनारने त्याच्या शर्टमध्ये लपवलेली कोयता बाहेर काढून नितेशवर हल्ला केला.

नितेशने हात पुढे करून हल्ला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्या डाव्या हाताच्या कोपर्‍यात गंभीर जखम झाली. जखमी झाल्यानंतर नितेश हा पळून गेला होता. त्यानंतर तिघेही तरुण नितेशच्या घराबाहेर गेले. हवेत कोयता हलवत ओरडू लागले, आम्ही धनकवडीचे भाई आहेत. असे म्हणत त्यांनी आजूबाजूच्या लोकांनाही शिवीगाळ केली.

हल्ल्यानंतर लगेचच नितेश त्याच्या वडिलांसह सहकारनगर पोलीस ठाण्याच्या अखत्यारित धनकवडी पोलिस चौकीत गेला. तेथील पोलिसांनी त्याला प्रथम उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर नितेशची लेखी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी बाबा मालुसरे, संकेत कसबे आणि सोहम सोनार यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता, २०२३ च्या कलम ११५(२) (खून करण्याचा प्रयत्न), ११८(१) (गुन्ह्याचे नियोजन), ३(५) (सार्वजनिक उपद्रव), ३५२ (हल्ला) आणि शस्त्रास्त्र कायदा, १९५९ च्या कलम ४ आणि २५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×