Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

काय सांगता…बंगल्यात केली गांजाची लागवड

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.

आरोपी अटकेत; ४१ झाडे लावल्याचे उघड

marathinews24.com

पुणे – लोहगाव भागातील एका बंगल्यात गांजाची लागवड करण्यात आल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी लोहगाव पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्याकडून सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

डेक्कन परिसरात टोळक्याची एकाला बेदम मारहाण, दातही पाडले – सविस्तर बातमी

हर्ष भरतकुमार पांचाल (वय ३०, रा. नमो पॅरेडाईज, पठारे वस्ती, लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पांचाल मूळचा गुजरातमधील अहमदाबादचा रहिवासी आहे. त्यांनी लोहगाव भागात एक बंगला भाडेतत्त्वावर घेतला होता. बंगल्यात त्याने गांजाची लागवड केली होती.

पांचाल हा गांजा विक्री करत असल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस शिपाई आकाश मोरे आणि अमोल आदलिंग यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बंगल्यात छापा टाकला. बंगल्यातील पाठीमागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत गांजाची ४१ झाडे लावल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याच्या मोटारीतून गांजा जप्त केला. अमली पदार्थ कायद्यान्वये पांचाल याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. गांजाची झाडे, मोटारीतील गांजा, तसेच मोटार असा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त साेमय मुंडे, सहायक आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोहगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील, सहायक निरीक्षक शुभांगी मगदूम, उपनिरीक्षक मनोज बरूरे, गणेश इथापे, अमोल आदलिंग, गणेश सातपुते, बाळासाहेब शिरसाठ, जोतीराम देवकाते, दादासाहेब बर्डे, अश्विन देठे, ज्ञानदेव आवारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×