Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

‘नाचून नाही, तर वाचून गणेशोत्सव साजरा करा‌’

‘नाचून नाही, तर वाचून गणेशोत्सव साजरा करा‌’

विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, छायाचित्रांचे प्रदर्शन

marathinews24.com

पुणे – ‌‘नाचून नाही, तर वाचून गणेशोत्सव साजरा करा‌’ हे विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्यासाठी शालेय स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात आले. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे, चित्रांचे, विविध छायाचित्रांचे प्रदर्शन दि. 28 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत भरविण्यात येणार आहे, अशी माहिती संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी आज (दि. 25 ऑगस्ट) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वृद्धी रिॲलिटीचे संचालक अमोल शहा,अस्तित्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. राजश्री जायभाये उपस्थित होते.

पुण्यात गणपती प्राणप्रतिष्ठापनानिमित्त वाहतूक बदल – सविस्तर बातमी 

‌‘नाचून नाही, तर वाचून गणेशोत्सव साजरा करा‌’ या अभिनव संकल्पनेतून बाल व कुमार वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कला व संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात काव्यवाचन, नाट्यछटा सादरीकरण, कथाकथन, रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाविषयी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी दोन शाळांमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कला व संस्कृती महोत्सवात पुण्यातील जवळपास पाच हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचे, रंगभरण स्पर्धेतील चित्रांचे तसेच श्रीनिवास अरविंद पतके यांच्या गणेशोत्सवातील छायाचित्रांचे प्रदर्शन दि. 28 ते दि. 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत यशवंतराव चव्हाण कला दालनात भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन दि. 28 रोजी सकाळी 10 वाजता बालसाहित्यकार ल. म. कडू यांच्या हस्ते होणार आहे. वृद्धी रिॲलिटीचे संचालक अमोल शहा, अस्तित्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. राजश्री जायभाने यांची प्रमुख उपस्थिती असेल.

शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांची अंतिम फेरी, प्रदर्शनाचा समारोप समारंभ दि. 31 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. समारोप समारंभ सायंकाळी 5 वाजता बालसाहित्यकार राजीव तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हल वैशिष्ट्यपूर्ण ठरावा यासाठी मुले तसेच पालकांसाठी फोटो कॉर्नर, गाणी, कवितांचे रेकॉर्डिंग करण्यासाची, शुभेच्छा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×