Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

उन्हाळी भुईमुगासाठी १०० टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे

शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) सन २०२५ अंतर्गत पिकांची उत्पादकता वाढविणे व सुधारित वाणांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने उन्हाळी हंगाम २०२५ साठी भुईमुग पिकाकरिता प्रति हेक्टर १५० किलो भुईमुग शेंगांचे प्रमाणित बियाणे (दर रु. ११४/- प्रति किलो)१०० टक्के अनुदानावर वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी प्रति लाभार्थी किमान ०.२० हेक्टर ते कमाल १ हेक्टर क्षेत्रासाठी लाभ देय राहणार आहे.

डॉ. बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार – सविस्तर बातमी

शासकीय बियाणे पुरवठादार संस्थांकडे भुईमुग बियाण्याचे २० किलो व ३० किलोचे पॅकिंग उपलब्ध असून, शेतकऱ्यांना पॅकिंग साईजनुसारच बियाणे वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे क्षेत्रानुसार आवश्यकतेपेक्षा अधिक बियाणे लागल्यास त्या अतिरिक्त रकमेचा भरणा शेतकऱ्यांना स्वखर्चातून करावा लागेल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील https://mahadbt.maharastra.gov.in/FarmerAgriLogin/AgrrilLogin या संकेतस्थळावरून प्रमाणित बियाणे वितरण, प्रात्यक्षिके, फ्लेक्झी घटक औषधे व खते टाईल सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. १०० टक्के अनुदानावरील या घटकासाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांची Agristack वर नोंदणी असणे बंधनकारक आहे. लाभार्थी निवड ही लक्षांकाच्या अधीन राहून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्वावर करण्यात येणार आहे.

या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×