पुण्यात देवीच्या मिरवणूकीत रथाला बसला करंट

पुण्यात देवीच्या मिरवणूकीत रथाला बसला करंट

वाघोलीत वीजेच्या धक्क्याने मंडळ कार्यकर्ता ठार

marathinews24.com

पुणे – शहरात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवीच्या मिरवणूकीत १७ फुट उंचीचा देखावे करणे मंडळाच्या अंगलट आले आहे. संबंधित देखाव्याला विद्युत तारेचा स्पर्श झाल्यामुळे २३ वर्षीय तरूणाचा करंट लागून मृत्यू झाला आहे. ही घटना ६ ऑक्टोबरला रात्री आठच्या सुमारास वाघोलीतील उबाळेनगरात रेणुका पार्क रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी सातजणांविरूद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केक शॉपची शाखा देण्याचे आमिष, ६ लाखांना गंडा – सविस्तर बातमी 

नितीन मोहन पवार (वय २३ रा. उबाळेनगर, वाघोली ) असे वीजेच्या धक्का बसल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी वसुंधर शिवदासभाउ उबाळे, संदीप छगनराव वहाडणे (रा. रेणूका पार्क वाघोली) संजीव श्रीपती जगदाळे (रा. उबाळेनगर) सचिन राजू नलावडे (रा. गोरे वस्ती वाघोली) संकेत शिवाजी राउत (रा. शिरवली बुद्रूक, जुन्नर) मयूर मच्छिंद्र थोरात (रा. मांजरवाडी, जुन्नर) मेहूल अविनाश नवले (रा. कुरंद, जुन्नर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलीस अमलदार अमोल काळे यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सव संपल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी वाघोलीतील उबाळेनगरात मंडळाकडून देवीची मिरवूणक काढली जाणार होती. त्यापार्श्वभूमीवर वाघोली पोलिसांनी त्यांना विविध सूचना दिल्या होत्या. प्रामुख्याने देखाव्याची उंची कमी ठेवण्याचे सांगितले होते. मात्र, पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत मंडळाने १७ फुट उंच आणि १४ फुट रूंद देखावा, सजावट, साउंड सिस्टीम उभारली होती. देवीची विसर्जन मिरवणूक सुरू असताना रेणूका पार्क रस्त्यावर सजावट रथाला विद्युत वायरचा स्पर्श झाला. त्यामुळे मंडळाचा कार्यकर्ता नितीन पवार याला जोरदार वीजेचा धक्का बसला. त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×