Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

विद्येच्या माहेरघरात मुले अंधारात…

विद्येच्या माहेरघरात मुले अंधारात...

महाविकास आघाडी आक्रमक

marathinews24.com

पुणे प्रतिनिधी (रेवण कोळेकर) : विद्येचे माहेरघर, शिक्षणाची पंढरी, सांस्कृतिक राजधानी अशा अनेक उपमा लाभलेल्या पुणेकरांना लाजिरवाणी करणारी घटना नवी पेठ भागात घडली आहे. पुणे महानगरपालिका शाळा क्रमांक १७ धर्मवीर संभाजी महाराज विद्यालयाची १३ ऑगस्टपासून वीज कापलेली असून शाळेतील विद्यार्थ्यांना अंधारात आणि पत्र्याच्या शेडमध्येच शिक्षण घ्यावे लागत आहे. दरम्यान, शेजारीच असलेल्या अनधिकृत व्यायामशाळा, अभ्यासिकेला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाठराखण केली आहे. भ्रष्टाचारामुळे लाखोंचे थकीत वीजबिल वाढत गेले, आणि शेवटी शाळेची वीजच तोडण्यात आली, असा आरोप महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आला आहे.

३० सेकंदापेक्षाही जास्त उशीर नाही! जपानच्या ट्रेनचं जगभर कौतुक – सविस्तर बातमी 

स्थानिकांसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या. मात्र, महापालिकेचे निर्ढावलेले अधिकारी गप्प बसले, अशी तीव्र टीका करण्यात आली आहे. पत्र्याच्या शेडमध्ये विद्यार्थ्यांना शिकवताना दिव्याचा उजेड नाही, पंखा नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे.शाळेचे दोन मजले धोकादायक आहेत असे दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांना खाली हॉलमधे पत्र्याचे शेड मारून वर्ग भरविण्यात आले आहेत. मनपा प्रशासनाने धोकादायक दाखवलेल्या मजल्यावरच नंतर २ वर्गांमधे सुशोभीकरण करून अभ्यासिका उभारली आहे प्रश्न हा आहे की हे कोणासाठी चालले आहे?

या प्रकरणावर संताप व्यक्त करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहर प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत यांनी सडकून टीका केली आहे. शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पुणे शहरात मुले अंधारात शिकतात, ही पुणेकरांसाठी लाजिरवाणी बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने याची दखल घ्यावी, कारण हे प्रकरण सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या आशीर्वादामुळेच घडले आहे. पुण्याचे खासदार, आमदार लक्ष देत नाहीत” पुणेकरांना शिक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागेल अशी परिस्थिती भविष्यात येऊ शकते, भाजप नगरसेवकांच्या खाऊगिरी पणामुळे, भ्रष्टाचारामुळे शाळेवर हे दिवस आले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसचे सागर धाडवे म्हणाले, गेल्या चार महिन्यांपासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. आधीच्या आणि आताच्या आयुक्तांना स्वतः भेटून तक्रार केली आहे. पण आयुक्त हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली असल्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. सत्ताधाऱ्यांच्या आशिर्वादाने शाळा अंधारात असताना अनधिकृत व्यायामशाळा आणि अभ्यासिका मात्र बेधडक सुरू आहेत.” सत्ताधारी भाजप नगरसेवकाचे कार्यकर्ते, पुणे मनपा मालमत्ता विभाग, शिक्षण मंडळ, महावितरण विभाग सर्वांनी मिळून हा भ्रष्टाचार केला असल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, विद्येच्या माहेरघरात आजही सामान्य घरातील मुलांना अंधारात शिक्षण घ्यावे लागत आहे, ही प्रशासनाच्या निष्क्रियतेची आणि भ्रष्टाचाराची चरम सीमा नाही का? यावेळी शिवसेना प्रभाग प्रमुख संजय साळवी, संघटक निलेश वाघमारे उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×