बकोरी रोडच्या दुरुस्तीबाबत नागरिक आक्रमक

बकोरी रोडच्या दुरुस्तीबाबत नागरिक आक्रमक

रस्त्यावर केले ठिय्या आंदोलन

marathinews24.com

पुणे – शहरानजीक वाघोली-बकोरी रोडची पावसामुळे दुरावस्था झाली आहे. गेल्या १३ वर्षापासून या रस्याची दुरावस्था झाली असून याठिकाणी खड्डे पडले आहेत. मुख्य रोडच्या दुरुस्तीसाठी रविवारी (दि. २४) नागरिक आक्रमक झाले होते. नागरिकांनी एकत्र येत रस्त्यावरच ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने दररोज अपघात होता आहेत. अपघात घडून गंभीर जखमा नागरिकांना होत आहेत. तर वाहनांचे प्रचंड नुकसान होत असल्याच्या नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.

विद्येच्या माहेरघरात मुले अंधारात; महाविकास आघाडी आक्रमक – सविस्तर बातमी 

रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. वाघोली पोलीस दाखल झाल्यावर त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. दरम्यान, परिस्थितीला जबाबदार असणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली. पोलिसांनी नागरिकांचे जबाब घेण्यात येत आहेत तर संबंधित बिल्डरला विचारणा केली आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार वाघोली पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याबाबत कारवाई केली जाणार आहे. प्रश्न सुटला नाही तर, काही दिवसात उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×