तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील हडपसर भागात महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सार्थक शिवाजी रुपनर (वय २२, रा. रुपनर वस्ती, लोणी काळभोर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत युवतीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन युवती महाविद्यालायत जात असताना आरोपी तिचा पाठलाग करायचा. तू मला आवडते, असे सांगून त्याने युवतीला अडवले. युवतीला तो त्रास द्यायचा. त्याच्या त्रासामुळे युवतीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक कोलेवाड तपास करत आहेत.
विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार
विवाहाच्या आमिषाने एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी बादशाह मशाक लाडलेकर (वय २७, रा. साडेसतरा नळी, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अब्दागिरे तपास करत आहेत.
























