Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

औंध – बोपोडी प्रभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांना आयुक्तांची भेट

औंध - बोपोडी प्रभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांना आयुक्तांची भेट

कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

marathinews24.com

पुणे – पुणे महानगरपालिकाचे आयुक्त नवल किशोर राम यांनी उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या विनंतीवरून आज औंध–बोपोडी प्रभागातील विविध रखडलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सर्व प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

महिला रुग्णालयाच्या वर्गवारीमध्ये बारामती महिला रुग्णालयास दुसऱ्या क्रमाकांचा पुरस्कार – सविस्तर बातमी 

या पाहणी दौऱ्यात उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्यासह स्थानिक नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका सपना छाजेड, नगरसेविका भक्ती गायकवाड, तसेच आरपीआयचे शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्ष अविनाश कदम, ज्ञानेश्वर जाविर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भेटीबाबत माहिती देताना उपमहापौर परशुराम वाडेकर म्हणाले की, प्रभागातील महत्त्वाच्या विकासकामांसाठी आयुक्तांकडे मागील अनेक दिवसांपासून वेळ मागण्यात येत होता. मात्र काल आयुक्तांनी स्वतःहून प्रभागाला भेट देण्याची तयारी दर्शवत, नागरिकांच्या प्रश्नांची प्रत्यक्ष पाहणी करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता आयुक्तांनी प्रभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांना भेट दिली.

या दौऱ्यात तथागत भगवान गौतम बुद्ध विपश्यना विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व ग्रंथालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडियम (चिखलवाडी) तसेच हरीश ब्रिज शेजारील मोकळे पटांगण या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या सर्व संबंधित खात्यांचे खातेप्रमुख उपस्थित होते.

आयुक्त नवल किशोर राम यांनी विपश्यना विहार व हॉकी स्टेडियमच्या प्रलंबित कामांचा आढावा घेत, ही कामे कोणताही विलंब न लावता तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जागेवरच दिले. तसेच हरीश ब्रिजलगत असलेल्या मोकळ्या पटांगणाच्या ठिकाणी नागरिकांसाठी सुसज्ज उद्यान (गार्डन) विकसित करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

या प्रत्यक्ष पाहणीमुळे औंध–बोपोडी प्रभागातील रखडलेले व महत्त्वाचे प्रकल्प आता वेगाने मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. आयुक्तांच्या या सकारात्मक भूमिकेबद्दल उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी त्यांचा सन्मान करून वेळ दिल्याबद्दल आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×