Breking News
Pune Chain Snatching : पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी सोनसाखळी हिसकावणार्‍या दोघांना बेड्या, ६ गुन्हे उघडकीसMaharashtra Voter List Revision : मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढSeva Sankalp Abhiyan 2026 : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतर्फे ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत विविध उपक्रमRabi Season Seed Subsidy : रब्बी हंगाम २०२६ साठी प्रमाणित बियाणे वितरणाकरिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहनPimpri Chinchwad RTO Action : प्रवासी वाहतुकीतून मालवाहतूक करणाऱ्या १८ वाहनांवर कारवाई; २ लाख १५ हजारांचा दंडPune Zilla Parishad : सक्षम माता, सशक्त किशोरी; रक्तक्षयमुक्त पुण्यासाठी जिल्हा परिषदेचा पुढाकारVB-G RAMJI Mission : १५ ऑक्टोबरपर्यंत ग्रामसभा; ३१ ऑक्टोबरपर्यंत कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्याचे नियोजनPune Bus Chain Theft : पुण्यात बसमध्ये जेष्ठाची चैन चोरणार्‍या माय-लेकाला बेड्याHadapsar Bar Assault : पुण्यात बारमध्ये आधी बील देण्याचा वाद, तरुणाला बेदम मारहाणBaner Murder Case : दोघांत मध्यस्थी करणार्‍या तरुणाचा भोसकून खून

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची बैठक संपन्न

महापालिका निवडणुकीनंतर पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक

marathinews24.com

पुणे – नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पुणे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक शहराध्यक्ष संजय सोनवणे आणि पक्षाचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

श्री शिवमहापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक वळविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी – सविस्तर बातमी

या बैठकीस उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेविका निशा मानवतकर, माजी नगरसेवक, संतोष आरडे, सुधीर वाघमोडे, रेणुका चलवादी, जयदेव रंधवे, हुलगेश चलवादी,  महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, टी. आर. तांबोळी, राजेंद्र चुव्हाण, नीलेश रोकडे, सुधीर जगताप, ॲड. भाऊसाहेब गोफणे, लिंबा कावरे, मनीषा मोहिते, कुणाल चावरे, विक्रांत कानडे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. पक्षाचे तीन उमेदवार निवडणूकीत यश संपादन करू शकले नाहीत त्यातील दोन उमेदवारांच तर अवघ्या दोनशे पेक्षा कमी मतांनी पराभव झाला, या पराभवाची कारण मीमांसा यावेळी करण्यात आली.  तसेच या बैठकीत शहरातील संघटनात्मक बळकटीकरण, आगामी निवडणुकांची तयारी तसेच समाजसेवेशी संबंधित विविध प्रकल्पांवर सखोल चर्चा करण्यात आली. स्थानिक विकासासाठी नव्या विकासात्मक योजनांची आखणी, शहरात  पक्षाची असलेली भक्कम ताकद लक्षात घेऊन विकासकामांचा आराखडा तयार करणे, तसेच पंचवार्षिक कार्यक्रम निश्चित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा आणि  एसआरए चे प्रश्न  प्राधान्यक्रमाने सोडविण्याचा  निर्धार व्यक्त करण्यात आला.

सर्व जाती-धर्मातील नागरिकांना एकत्र आणत सामाजिक ऐक्य वाढवणे आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करणे हेच आपले प्रमुख ध्येय असल्याची भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच निवडणूकीत पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याचे सर्वाधिकार अध्यक्षांना देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×