Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

काँग्रेसने सोडवला प्रभाग ३८ मधील महाविकास आघाडीतील पेच

अस्मिता रणभरे याच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार; शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या पत्राने अन्य दोन उमेदवार बंडखोर निश्चित

marathinews24.com

पुणे – आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ३८ मध्ये महाविकास आघाडीत निर्माण झालेला पेच काँग्रेसने अखेर सोडवला असून, आता इथे काँग्रेसचा एक, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चार असे पाच उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील. प्रभाग क्रमांक ३८-अ गटामधून अस्मिता भूषण रणभरे यांनाच काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी रणभरे यांना अधिकृत उमेदवारीचे पत्र दिले आहे. त्यामुळे प्रभाग ३८ मधील काँग्रेसच्या उमेदवारीबाबतचा संभ्रम दूर झाला असून, रणभरे यांची उमेदवारी अंतिम ठरली आहे. उर्वरित चारही गटात शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील.

नऱ्हे येथे योगेश कदमांची जोरदार सभा; पुणे महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे केले आवाहन – सविस्तर बातमी 

पुण्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात झालेल्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार अस्मिता रणभरे याच एकमेव अधिकृत उमेदवार असल्याचे शहराध्यक्षांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या समन्वयातून प्रभागनिहाय उमेदवारी निश्चित केली असून, संघटनात्मक ताकद, कार्याचा अनुभव आणि स्थानिक पातळीवरील स्वीकारार्हता लक्षात घेऊन अस्मिता रणभरे यांची निवड करण्यात आली आहे. रणभरे यांच्यासह आघाडीच्या उमेदवारांना सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, या प्रभागातून काँग्रेसच्या वतीने अर्ज भरलेले दोन्ही उमेदवार अनधिकृत असतील व त्यांना बंडखोर समजले जाईल. महाविकास आघाडीतील कोणत्याही कार्यकर्त्यांनी या बंडखोर उमेदवारांना पाठिंबा देऊ नये. प्रभाग ३८ मधील अस्मिता रणभरे, सुनील मांगडे, सुवर्णा पायगुडे, कल्पना थोरवे व वसंत मोरे या पाचही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस व शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी जोरात काम करावे, असे आवाहनही शिंदे यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×