इमारतीतून पडून बांधकाम मजुराचा मृत्यू

इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून पडल्याने मजुराचा मृत्यू

ठेकेदाराविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – नियोजित गृहप्रकल्पात काम करणारा मजूर तोल जाऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना हडपसरमधील महंमदवाडी परिसरात घडली. मजुराला सुरक्षाविषयक साधने न पुरविता दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

विवाह समारंभातून पावणेतीन लाखांचे दागिने चोरी – सविस्तर बातमी

अरबाज कयामुद्दीन शेख असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याप्रकरणी ठेकेदार मुर्तुजा खुलेमा भोपाली (वय २९, रा. समृद्धी जीवन सोसायटी, पिसोळी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कयामुद्दीन अमीन शेख (वय ४५, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील महंमदवाडी भागात एका नियोजित गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. २७ ऑक्टोबर रोजी अरबाज शेख हा गृहप्रकल्पात काम करत होता. त्यावेळी तोल जाऊन पडल्याने अरबाज गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. ठेकेदार भोपाली याने सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या नव्हत्या. बांधकामाच्या ठिकाणी संरक्षक जाळी बसविण्यात आली नव्हती, तसेच मजूर अरबाज याला हेम्लेट पुरविण्यात आले नव्हते. पोलीस चौकशीत ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे उघड झाले. त्यानंतर याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×