Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

बालगंधर्व परिवार ट्रस्ट, महाराष्ट्रच्या वतीने पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न

जेष्ठ कलावंतांना विमा पॉलिसी चे वाटप

marathinews24.com

पुणे – बालगंधर्व परिवार ट्रस्ट, महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने पाककला स्पर्धा आणि सभासदांना अपघाती विमा पॉलिसी वाटप चा कार्यक्रम पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्र,पुणे येथे संपन्न झाला.

स्त्री-पुरुषांमधील मैत्रीकडे पाहण्याचा अभाव- प्रा. मिलिंद जोशी – सविस्तर बातमी

यावेळी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपट निर्माते अमित पोतदार,पाककला स्पर्धेचे परीक्षक किशोर सरपोतदार,मास्टर शेफ सर्वेश जाधव,भारती मेढी,अलविरा मोशन पिक्चर्स च्या दिपाली कांबळे, पुणे म. न. पा. चे चव्हाण, परिवाराचे कार्यकारिणी सदस्य अरुण गायकवाड,विनोद धोकटे,विनायक कडवळे, हरीश गुळीग,शंकर घोडेराव,मिटठू पवार, उमेश मोडक उपस्थित होते.

या प्रसंगी प्रास्ताविक अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केले.तसेच परिवाराचे सचिव चित्रसेन भवार आणि परिवारातील महिला कार्यकारिणी सदस्य वर्षा संगमनेरकर,वनमाला बागूल,शिल्पा भवार,स्वाती धोकटे, हेमा कोरभरी,मृणाल लोणकर यांनी श्रावण सोहळा या कार्यक्रमात गीत आणि नृत्याने धमाल केली.

पाककला स्पर्धेच्या विजेत्या महिला उल्का ओझरकर, वर्षा दाभाडे,सीमा नलावडे,मनीषा भावे, सोनाली पाटे,विद्या ताम्हणकर यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमात प्रतिनिधिक स्वरूपात ज्येष्ठ कलावंताना विमा पॉलिसी चे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी परिवाराचे खजिनदार अनिल गुंजाळ आणि कार्यकारिणी सदस्य योगेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच सूत्रसंचालन कार्यकारिणी सदस्य शोभा कुलकर्णी यांनी केले तर परिवाराचे उपाध्यक्ष पराग चौधरी यांनी आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×