Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कोर्टाकडून दिलासा

मुंजा गित्ते जमीन खरेदी खटला पुनरुज्जीवित करण्यास स्थगिती

marathinews24.com

बीड – जगमित्र शुगर्स या प्रस्तावित कारखान्यासाठी जमीन खरेदी प्रकरणात माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्यासह तिघांविरुद्ध फसवणूक खटल्यात अंबाजोगाई न्यायालयाने संबंधितांना दोषमुक्त केले होते. त्यानंतर हा खटला पुन्हा सुरू करण्याचा अर्ज आल्यानंतर न्यायालयाने तो खटला पुनरुज्जीवित करण्यास स्थगिती दिली आहे. मुंडे यांच्यावतीने वकील ऍड अशोक कवडे यांनी स्थगिती अर्ज दाखल केला होता.

अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाच्या शिरपेचात मानाचा बहुमान – सविस्तर बातमी

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल करेपर्यंत किंवा अपिलाची मुदत पूर्ण होईपर्यंत हा खटला चालविण्यास अंबाजोगाई अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ही स्थगिती दिली आहे. २०११-१२ साली खरेदी केलेल्या या जमिनीच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या विरोधात बर्दापूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली, तत्कालीन परिस्थितीत पोलिसांनी तपास करून तक्रारीत तथ्य न आढळल्याने गुन्हा दाखल केला नाही, त्यानंतर उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात दोन्ही पक्षांचे म्हणणे, साक्ष, पुरावे इत्यादी वस्तुस्थिती पाहून अंबाजोगाई न्यायालयाने धनंजय मुंडे व अन्य तिघांना दोषमुक्त केले होते. मात्र त्याविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यावर मुंडे यांच्या वकिलांनी केलेल्या अर्जावर दोन्ही बाजूंचे म्हणणे न्यायालयाने ऐकल्यानंतर स्थगिती दिली.

मुंडे यांना अपील करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला आहे. न्यायालयाचा स्थगिती निकाल स्वयंस्पष्ट असून तो न्यायालयाच्या पोर्टलवर देखील उपलब्ध आहे. मात्र याबाबत अर्धवट माहितीच्या आधारे कुणीतरी खोडसाळपणाने चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले असून, संबंधितास कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे मुंडे यांचे वकील ऍड अशोक कवडे यांनी सांगितले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×