Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

महिलेशी संबंध असल्याचा संशयातून चुलत भावाचा केला खून

चारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

मृतदेह पोत्यात भरून टाकून दिला 

marathinews24.com

पुणे – गावच्या महिलेसोबत संबंध असल्याच्या संशयावरुन चुलत भावाने भावाचा गळ्यावर चाकूने वार करुन खुन केला. त्यानंतर त्याचा मृतदेह पोत्यात भरुन गुजरवाडीच्या डोंगरात टाकून दिल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. अजय पंडित (वय २३, रा. खोपडेनगर, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. अशोक पंडित (वय ३५, रा. मोशी) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १७ नोव्हेंबरला घडली आहे.

सराईत टिपू पठाणसह टोळीविरूद्ध आणखी एक मोक्का – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय पंडित आणि अशोक पंडीत दोघेही झारखंडचे असून मागील चार वर्षांपासून पुण्यात काम करीत आहेत. कामानिमित्त अजय हा खोपडेनगरमध्ये लेबर कॅम्पमध्ये राहत होता. तो बेपत्ता असल्याची तक्रार भारती विद्यापीठ पोलिसांकडे नोंदविण्यात आली. हा घातपाताचा प्रकार असावा, असा पोलिसांना संशय आला. त्यानुसार त्यांनी तपास करण्यास सुरुवात केली. तांत्रिक तपासासह सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अजयचा चुलत भाऊ अशोक पंडित याचा संशय पोलिसांना आला.

भारती विद्यापीठ पोलिसांनी अशोकला पिंपरीतून ताब्यात घेतले. पोलीस चौकशी केल्यावर त्याने अजयचा खुन केल्याची कबुली दिली. गावातील महिलेसोबत अजयचे संबंध असल्याचा संशयातून खून केल्याचे त्याने सांगितले. तसेच मृतदेह गुजरवाडीतील डोंगरात टाकल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी अजय पंडितचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात दाखल केला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×