Breking News
मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे गजाआडपुण्यात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छादट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यूमंगळागौर स्नेहमेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसादतब्बल ५ महिलांनी घेतला-बांगड्या अन मेहंदीचा आनंदस्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुतेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टिळक कुटुंबियांचे सांत्वनपुणे शहरातील पाणीगळतीच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी कृतीदल स्थापन करापार्टीत ड्रग्जचा पुरवठा करणार्‍यांचा शोध सुरूतीन मित्रांच्या भोवतीचा पौर्णिमेचा फेरा उलगडणार की अजून गुंता वाढणार, ‘पौर्णिमेचा फेरा सिझन २’ प्रदर्शित

Crime News : दुचाकींसह रिक्षा चोरणार्‍याला अटक, ५ दुचाकी, रिक्षा जप्त

Crime News : दुचाकींसह रिक्षा चोरणार्‍याला अटक, ५ दुचाकी, रिक्षा जप्त

काळेपडळ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – Crime News  : शहरातील काळेपडळ परिसरातून दुचाकींसह रिक्षाची चोरी करणार्‍या परप्रांतीय चोरट्याला काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५ दुचाकी आणि एक रिक्षा अशी ४ लाख ५७ हजारांची वाहने जप्त केली आहेत. मोहम्मद नजीम जमील सलमानी ( रा. गल्ली नं. १७, सय्यदनगर, हडपसर, मुळ रा. करनाळगंज, लखनौ, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

स्वस्तात मोटार विक्रीचे दाखवले आमिष, पोलीस हवालदाराला ४ लाखांना गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. दाखल गुन्ह्यातील चोरीच्या प्रकरणात पोलीस शोध घेत असताना पोलीस अंमलदार शाहीद शेख व महादेव शिंदे यांना आरोपीची माहिती मिळाली. तो आरोपी गुन्हयातील चोरी केलेल्या गाडीसह मिळुन आला. चौकशीत त्याने यापुर्वीही दुचाकी आणि रिक्षाची चोरी केल्याची कबुली दिली. ही कामगिरी उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक, अमर काळंगे, एपीआय अमित शेटे, प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहीगुडे, शाहीद शेख, श्रीकृष्ण खोकले, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे यांनी केली.

गांजा तस्कर गजाआड, १४ किलो गांजा जप्त

Crime News : गांजा विक्रीसाठी आलेल्या अहिल्यानगरमधील तस्कराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून २ लाख ८१ हजार रुपयांचा १४ किलो गांजा, मोबाइल, मोटार असा ६ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. योगेश रामभाऊ साळवे (वय २५, रा. सोनाई, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. साळवेविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंध कायद्यान्वये विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Crime News

अमली पदार्थ विरोधी पथक नगर रस्त्यावर गस्त घालत होते. त्वेळी आगानगर सोसायटी रस्त्यावर योगेश साळवे मोटारीत थांबला होता. त्याच्याकडे गांजा असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने साळवेला सापळा रचून पकडले. मोटारीतील पिशवीची तपासणी करण्यात आली. पिशवीत गांजा आढळून आला. पोलिसांनी १४ किलो गांज्यासह मोटार, मोबाइल असा मुद्देमाल जप्त केला. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पोलीस कर्मचारी विशाल दळवी, सचिन माळवे, संदीप शिर्वेâ प्रवीण उत्तेकर, विनायक साळवे, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, रेहाना शेख, स्वप्नील मिसाळ यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top