दौंड, बारामती व इंदापूर तालुक्यात जमावबंदी आदेश लागू

दौंड, बारामती व इंदापूर तालुक्यात जमावबंदी आदेश लागू

जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आदेश 

marathinews24.com

पुणे – भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ खाली प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सन २०२५-२६ चे उन्हाळी अवर्तन सुरळीत पार पाडण्याकरीता अवर्तन संपेपर्यंत खडकवासला मुठा-उजवा कालव्याचे दौंड, बारामती व इंदापूर तालुक्यात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत.

पुणे पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला महिलेचा जीव – सविस्तर बातमी 

शेटफळगडे, अकोले, पारवडी, निरगुडे, कळस, लोणी देवकर, रावणगाव, नंदादेवी, मळद, शिर्सूफळ, पारवडी, गिरीम, गोपाळवाडी, माळवडी, मेरगळवाडी व इंदापूर भागात कालव्याचे दोन्ही बाजूस १०० मीटर अंतरावर या ठिकाणासह कालव्याच्या पूर्ण परिसरात जमावबंदी आदेश लागू राहणार आहे. या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ मधील तरतूदी व प्रचलित काद्यान्वये शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×