वाढदिवसाला तलवारीने केक कापणे अंगलट

इन्ट्रावरील व्हारयल व्हिडीओनंतर गुन्‍हा दाखल

marathinews24.com

पुणे – रस्‍त्‍यावरच वाढदिवस साजरा करत तलवारीने केक कापल्‍याप्रकरणी हडपसर शेवकर वस्‍तीवरील टोळक्‍यावर आर्म ॲक्‍टनुसार कारवाई करत वानवडी पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. याप्रकरणी अल्‍पवयीन बड्डे बॉय सह त्‍याच्‍या अन्य साथीदारांवर तलवारीने केक कापून दहशत पसरविल्‍याप्रकरणी गुन्‍हा दाखल केला आहे. हत्‍यारांचा वापर करून रस्‍त्‍यावरच केक कापत दहशत पसरविण्याचे गुन्‍हेगारी कृत्‍य करू नये अशा पुणे पोलिसांनी वारंवार सुचाना दिल्‍या आहेत.

पुण्यात पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी

पोलिस अमंलदार अमोल गायकवाड हे १८ फेब्रुवारीला वानवडी पोलिस ठाण्यात काम करत होते. त्‍यांना एकाने इन्स्‍ट्राग्रामवर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ दाखविला. याच व्हिडीओत धारदार तलवानी केक कापून नंतर तलवार हवेत नाचवून दहशत पसरविल्‍याचे निदर्शनास आले. दरम्‍यान हा वाढदिवस हडपसर येथील शेवकर वस्‍ती, लक्ष्मीनगर येथील यल्‍लाम्‍मा मंदिराजवळ रस्‍त्‍यावर केल्‍याची माहिती मिळाली. दरम्‍यान तेथे जाऊन परिसरात राहणाऱ्या लोकांकडे विचारपूस केली असता दि. १७ फेब्रुवारी रात्री नऊ वाजता ज्‍याचा वाढदिवस आहे त्‍याने धारदार तलवारीने केक कापून नंतर त्‍याने व त्‍याच्‍या साथीदारांनी दहशत पसरविल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली.

दरम्‍यान पोलिसांनी दिलेल्‍या आदेशाचा भंग केल्‍याप्रकरणी बड्डे बॉय आणि त्‍याच्‍या साथीदारांवर हा गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वानवडी पोलिस करत आहेत. अशा पध्दतीने धारदार हत्‍यारांनी केक कापून दहशत पसरविण्याचा कोणी प्रयत्‍न केल्‍यास त्‍यांच्‍यावर कारवाई सुरूच राहणार असल्‍याचे पोलिसांनी सांगितले

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×