Breking News
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांत्वनशेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार- कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटेपशुसंवर्धन व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यासाठी सकारात्मक-उपमुख्यमंत्री अजित पवारपुढील वर्षी बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग- सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलारपुण्यात कॉल सेंटरच्या आडून ‘सायबर गुन्हेगारी’चा डावमाझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे, बदनामी थांबवा- विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकरबनावट कागदपत्राच्या आधारे भारतात केला प्रवेश१० कोटीचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने ३५ लाखांची फसवणूकमहाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढविण्यासोबतच सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी काम करावे-उपमुख्यमंत्री अजित पवारशेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासोबतच कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणाकरिता राज्य शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यात कॉल सेंटरच्या आडून ‘सायबर गुन्हेगारी’चा डाव

खराडीतून ‘डेटा’ आणि ‘डॉलर’चा काळा व्यापार उघडकीस; १ लाख डेटावरून रोज ३२ लाखांना गंडा

marathinews24.com

पुणे -‘डिजीटल अरेस्ट’ची भिती घालून अमेरिकेतील नागरिकांकडून दररोज लाखो रुपये उकळणार्‍या खराडीतील बनावट कॉल सेंटरचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला. येथे तब्बल १२३ कर्मचारी काम करीत होते. त्यांच्याकडे रोज तब्बल एक लाख अमेरिकन नागरिकांचा डेटा देण्यात येत होता.

माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे, बदनामी थांबवा- विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर – सविस्तर बातमी

‘तुमच्या खात्यातून ड्रग्जचे व्यवहार झाले आहेत, तुम्हाला पोलिसांकडून अटक केली जाऊ शकते, अशी भिती घालून रोज सायबर फसवणूकीच्या माध्यमातून तब्बल ३० ते ४० हजार डॉलर्स (सुमारे ३२ ते ३३ लाख रुपये) अमेरिकन नागरिकांकडून उकळले जात होते. हा पैसा हवालाच्या माध्यमातून देशात येत होता. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ५ जणांना अटक केली असून मूख्य सूत्रधारासह ३ जण फरार आहेत. अटक केलेले आरोपी हे गुजरात, राजस्थान या राज्यातील असून बहूतांश कर्मचारी देखील परराज्यातील आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेल्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

सरजितसिंग गिरावतसिंग शेखावत ( सध्या रा. खराडी, मूळ रा. झुंझुनू, राजस्थान), अभिषेक अजयकुमार पांडे (मूळ रा. अहमदाबाद, गुजरात), श्रीमय परेश शहा (मूळ रा. अहमदाबाद), लक्ष्मण अमरसिंग शेखावत (मूळ. रा. अहमदाबाद) आणि अ‍ॅरोन अरुमन खिश्चन (मूळ रा. अहमदाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, करण शेखावत (रा. अहमदाबाद), संजय मोरे आणि केतन रवाणी हे तिघे फरार झाले आहेत. यातील करण शेखावत हा सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. तर, अटक केलेल्यांपैकी सरजितसिंग शेखावत हा मॅनेजर म्हणून काम करायचा. खराडी – मुंढवा रस्त्यावरील प्राईड आयकॉन या इमारतीच्या ९ व्या मजल्यावर मैग्नटेल बीपीएस अ‍ॅण्ड कन्सल्टंस या नावाने हे कॉल सेंटर सुरू होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, खराडी येथे कॉल सेंटर असून तेथून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक होत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यानूसार शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनी कॉल सेंटरवर छापा टाकला. त्यावेळी तेथे १२३ लोक उपस्थित होते. त्यात १२ महिला होत्या. हे सर्वजण कर्मचारी म्हणून तेथे काम करीत होते. पहाटे सहा वाजेपर्यंत पोलिसांनी कॉल सेंटरची झडती घेतली. प्राथमिक चौकशीनंतर त्यांच्याकडून काम करून घेणार्‍या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. तीन फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे, अर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, स्वप्नाली शिंदे, शब्बीर सय्यद, प्रताप मानकर, वाहीद पठाण, उपनिरीक्षक तुषार भोसले, वैभव मगदूम, वैâलास चव्हाण, अविनाश इंगळे, एकनाथ जोशी, विजय पवार, निलेश जाधव, हरीष मोरे, विशाल इथापे, सुभाष आव्हाड, विठ्ठल वाव्हळ, प्रवीण रजपूत, सीमा सुडीत, स्मिता हंबीर, जान्हवी मडेकर आदींसह पथकाने ही कारवाई केली.

असे चालवले जात होते रॅकेट

कॉल सेंटरमधील कर्मचारी अमेरिकन नागरिकांना फोन करून त्यांना बँक खात्यांशी संबंधित समस्या किंवा पोलिस तसेच तुमच्या खात्यातून ड्रग्सचे व्यवहार झाले असून तुम्हाला अटक होऊ शकते, अशी भिती घालून त्यांना ‘डिजीटल अरेस्ट’ करायचे. त्यानंतर यापासून बचावासाठी क्रिप्टो करन्सी किंवा अ‍ॅमेझॉन गिफ्ट व्हाउचर्सच्या स्वरूपात त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. हे पैसे इंटरनॅशनल हवालाच्या माध्यमातून देशात आणण्यात येत होते. त्यांची महिन्यात ७ ते ८ कोटींची उलाढाल होती, अशी प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, अटक आरोपी एकाच भागातील आहेत. त्यांची एकमेकांशी कशी ओळख झाली तसेच त्यांनी कर्मचार्‍यांची नेमणूक कशी केली, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

१० हजार स्क्वेअर फुट ऑफिस, ९ लाख भाडे

जून २०२४ पासून खराडी येथे सुमारे १० हजार स्क्वेअर फूटाच्या क्षेत्रफळात हे कॉल सेंटर सुरू होते. त्याला महिन्याला ९ लाख एवढे भाडे असल्याची माहिती आहे. येथून आरोपी सायबर गुन्हे करायचे. अमेरिकन नागरिकांना फोन करण्यासाठी नेमलेले कर्मचारी हे सर्व गुजरात, राजस्थान, दिल्ली या राज्यातील असून त्यांचे शिक्षण दहावी, बारावी पर्यंत झालेले आहे. पोलीस या प्रत्येकाची चौकशी करीत आहेत.

६४ लॅपटॉप, ४१ मोबाईल, ४ राऊटर जप्त

कॉल सेंटरमध्ये अमेरिकन वेळेनूसार सायंकाळी ६ ते रात्री २ पर्यंत काम चालायचे. येथून पोलिसांनी ६४ लॅपटॉप, ४१ मोबाईल, ४ राऊटर जप्त केले आहेत. कर्मचार्‍यांना रोज फोन करण्यासाठी दिली जाणारी एक लाख जणांची यादी नेमकी कुठून आणि कशी येत होती, फसवणूकीनंतर मिळणारे पैसे देशात कसे येत होते, याबाबत गुुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे.

कारवाईची भिती दाखवून अमेरिकन नागरिकांची सायबर फसवणूक करणार्‍या कॉल सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे. आरोपी अमेरिकेतील नागरिकांचा डेटा कसा मिळवित होते, यामध्ये आणखी कोण सहभागी आहे, याबाबत पुढील तपास करण्यात येत आहे.

– रंजनकुमार शर्मा, सहपोलीस आयुक्त, पुणे शहर.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top