सायबर चोरांकडून तिघांना २४ लाखांचा ऑनलाईन गंडा

सायबर चोरांकडून तिघांना २४ लाखांचा ऑनलाईन गंडा

चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी मारला डल्ला 

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांनी पुणेकरांना अक्षरशः वेठीस धरले असून, दरदिवशी विविध प्रकाराचे आमिष दाखवून ऑनलाईनरित्या गंडा घातला जात आहे. त्यामुळे सुशिक्षितांपासून ते अशिक्षित नागरिकांपर्यंत अनेकजण जाळ्यात अडकत असल्याचे फसवणूकीच्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. सायबर चोरट्यांनी तीन घटनांमध्ये तिघांची २३ लाख ८५ हजार ९३ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी खडकी आणि खराडी पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल केला आाहे.

पोलीस संरक्षण आणि शस्त्र परवान्यासाठी केला गोळीबाराचा प्लॅन – सविस्तर बातमी 

शेअर ट्रेडिंग कंपनीत गुंवकणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाची ३ लाख ९० हजारांची फसवणूक केली. ही घटना २५ डिसेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत घडली असून, डेव्हीड जोसेफ व जेसिका नामक व्यक्तींसह विविध व्हॉट्सअप ग्रुप व बँक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिस निरीक्षक बागवे प्रकरणाचा करत आहेत. दुसर्‍या घटनेत, सायबर चोरट्यांनी खडकी परिसरातील ४३ वर्षीय तक्रारदाराला शेअर ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यांची ११ लाख ८० हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना ११ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२४ कालावधीत घडली. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक फुलपगारे करत आहेत.

अतिरिक्त कमाईचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेला ८ लाख १५ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १२ ते १७ मार्च दरम्यान खराडीत घडली असून, ५३ वर्षीय महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अवंतिका, स्वाती शर्मा, रिसीका मेहेरा यांच्यासह अन्य मोबाईल नंबर धारकांविरोधात गुुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×