Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

नृत्यांगना गौतमी पाटील यांचे “राणी एक नंबर” गाणं प्रदर्शित

नृत्यांगना गौतमी पाटील यांचे “राणी एक नंबर” गाणं प्रदर्शित

सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल

marathinews24.com

पुणे – सबसे कातील गौतमी पाटील हिच पिवोट म्युझिक प्रस्तुत “राणी एक नंबर” हे भन्नाट गाणं नुकतच प्रदर्शित झाल आहे. विशेष म्हणजे हे गाण बॉलिवूड स्टाईल आणि ग्राफ़िक्सचा वापर करून बनवलेलं आहे. तसेच गायिका सोनाली सोनवणे हिने या गाण्याला स्वरसाज दिला आहे. रोहन साखरे यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर कैलाश पवार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार मोहन उपासनी यांनी संगीत दिलं आहे. संगीत नियोजन मोहन उपासनी आणि संकेत गुरव यांनी केले आहे. या गाण्याची कोरिओग्राफी गोपी बैरागी आणि निलेश भोर यांनी केले आहे. तसेच या गाण्याची प्रोजेक्ट हेड विनया सावंत आहे. तर गाण्याच्या पब्लिसिटी फॉरेवर पीआर ही कंपनी करत आहे.

संस्कृती, समाजस्वास्थ्य टिकवण्यात लोककलावंतांचे योगदान-डॉ. भावार्थ देखणे – सविस्तर बातमी 

गौतमी पाटील “राणी एक नंबर” गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगते, “या गाण्याच्या नावातच “राणी एक नंबर” आहे. त्यामुळे तुम्हाला कळालचं असेल गाणं एक नंबरच असेल. खरच गाणं खूप सुंदर झालं आहे. मला या गाण्याच्या शूटला खूप मज्जा आली. मला खात्री आहे की तुम्हालाही हे गाणं खूप आवडेल. तुम्ही नक्कीच या गाण्यावर थिरकणार आहात. तसेच मी पिवोट म्यूजिकचे आणि संगीतकार मोहन उपासनी यांचे आभार मानते की त्यांनी मला या गाण्यात संधी दिली. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की जस तुम्ही माझ्या इतर गाण्याला भरभरून प्रेम दिल तसच प्रेम “राणी एक नंबर” या गाण्याला द्या. राणी एक नंबर या गाण्यावर तुमचे सुंदर रील व्हिडिओ बनवा. आणि मला जरूर टॅग करा. तुम्हाला हे गाण कस वाटल हे आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा.”

गायिका सोनाली सोनवणे “राणी एक नंबर” गाण्याच्या रेकॉर्डिंग विषयी सांगते, राणी एक नंबर हे गाणं कम्प्लीटली फीमेल सेंट्रिक गाणं आहे. एक मुलगी जेव्हा सेल्फ ऑब्सेसड आणि कॉन्फिडेंट आहे तर ती काय बोलेल याचा अभ्यास मी केला. आणि तशाच हरकती मी या गाण्यात घेतल्या आहेत. गाण्याची संपूर्ण टीम म्यूजिक स्टूडियोमध्ये उपस्थित होती. सगळ्यांनी मला प्रोत्साहन दिल. हे गाणं डान्सिकल आहे. त्यामुळे मी ते संपूर्ण एनर्जीने गाणं गायल आहे. मला गाणं गाताना खूप मज्जा आली. या गाण्याला प्रेक्षकांचा खूप सुंदर प्रतिसाद मिळतोय ते पाहून फार आनंद होत आहे.”

संगीतकार मोहन उपासनी गाण्याविषयी सांगतात,” एक नंबर हा शब्द माझ्या डोक्यात घोळत होता. त्या शब्दाला घेवून हे गाण करायचं मी ठरवल. आणि मी जेव्हा कंपोझिशन करायला बसलो. तेव्हा हे कॉम्बिनेशन जुळून येत होत. अशी ही सर्व गाण्याची सुरुवातीची प्रोसेस होती. या गाण्याला अप्रतिम प्रतिसाद मिळतोय. पिवोट म्यूजिक सर्व प्रेक्षकांसाठी नेहमीच उत्तमोत्तम गाणी घेवून आणण्याचा प्रयत्न करेल. राणी एक नंबर हे गाणं सध्या इंस्टाग्रामवर ट्रेंडिंगवर आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे.” Link – https://yt.openinapp.co/c83y1

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×