गणेशात्सवाच्या पार्श्वभूमीवर दर्शन सहलीचे आयोजन

अधिकाधिक पर्यटकांनी या सहलीचा सहभाग लाभ घेण्याकरिता नोंदणी करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सव कालावधीत देशी-विदेशी पर्यटकांकरिता पुण्यातील नामांकित गणेश मंडळाच्या दर्शनाकरिता गणेश दर्शन सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे; अधिकाधिक पर्यटकांनी या सहलीचा सहभाग लाभ घेण्याकरिता नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पर्यटन संचालनालय, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे.

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी – सविस्तर बातमी

उपक्रमाअंतर्गंत वय ६० वर्षे व त्याहून अधिक वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना गणेश दर्शन सहल आयोजित करण्यात येत आहे. १ सप्टेंबरला ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींसाठी त्रिशुंडया गणपती, कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग, दगडूशेठ हलवाई, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, बाबू गेनू गणपती व अखिल मंडई मंडळ या गणपतींच्या थेट दर्शनाची सुविधा करण्यात येणार आहे. इच्छुकांकरिता दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 ते दु. 1.30 वाजेपर्यंत कात्रज डेपो, हडपसर (गाडीतळ), कोथरुड डेपो, शिवाजीनगर (मॉडेल कॉलनी) व येरवडा (गुंजन टॉकीज) या आगारामधून पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. यांच्या ५ वातानुकूलीत बसेस (प्रती बस ३५ प्रवासींकरीता) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ज्येष्ठ नागरिकांसाठी पर्यटन विभागाव्दारे मार्गदर्शक, अल्पोपहार, पाणी व आरोग्य सेवक (प्रथमोपचार संचासह) आदींची सोय करण्यात आली आहे. नाव नोंदणीकरणेरिता गणेश बेंद्रे (संपर्क क्रमांक 9730993282) करावा तसेच गुगल फार्म- https://forms.gle/BbE36QZDyasCGH2A व क्युआर कोड वर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय पर्यटन कार्यालयाच्या उपसंचालक शमा पवार यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×