ट्रॅक्टर अनुदानासाठी लाचेची मागणी

ट्रॅक्टर अनुदानासाठी लाचेची मागणी

सासवडमध्ये मंडल कृषी अधिकाऱ्यावर गुन्हा

marathinews24.com

पुणे – महाडीबीटी पोर्टलवर ट्रॅक्टर खरेदीसाठी शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अनुदानाचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी लाच मागणाऱ्या सासवडमधील पुरंदर पंचायत समितीतील मंडल कृषी अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. संबंधित अधिकाऱ्याने सुरुवातीला पाच हजार रुपयांची मागणी केली होती; मात्र तडजोडीनंतर तीन हजार रुपयांची लाच मागताना तो निष्पन्न झाला. अमोल सुनील सुतार (वय ३१, रा. पुरंदर रेसिडेन्सी, सासवड-सोनोरी रोड, ता. पुरंदर, जि. पुणे; मूळ रा. मु. पो. राजाळे, ता. फलटण, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत ५८ वर्षीय शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार दिली होती.याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पुणे पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला महिलेचा जीव – सविस्तर बातमी 

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारानी दि. ६ ऑगस्ट २०२४ रोजी महाडीबीटी पोर्टलवर ट्रॅक्टर खरेदीसाठी शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अनुदान मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. हा अर्ज पुरंदर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या मंडल कृषी अधिकारी अमोल सुतार यांच्याकडे आला होता. अर्जावर साईट व्हिजिट करून अहवाल पुढे पाठविण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र अहवाल पुढे पाठविण्यासाठी सुतार यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. त्यानुसार एसीबीने सापळा रचला असता, तडजोडीनंतर सुतार तीन हजार रुपयांची लाच मागताना निष्पन्न झाला. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजी पाटील, अर्जुन भोसले, पोलिस निरीक्षक शैलजा शिंदे, निरीक्षक आसावरी शेडगे यांच्या पथकाने केली.

सासवडमध्ये मंडल कृषी अधिकाऱ्यावर गुन्हा

पुणे- महाडीबीटी पोर्टलवर ट्रॅक्टर खरेदीसाठी शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अनुदानाचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी लाच मागणाऱ्या सासवडमधील पुरंदर पंचायत समितीतील मंडल कृषी अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. संबंधित अधिकाऱ्याने सुरुवातीला पाच हजार रुपयांची मागणी केली होती; मात्र तडजोडीनंतर तीन हजार रुपयांची लाच मागताना तो निष्पन्न झाला. अमोल सुनील सुतार (वय ३१, रा. पुरंदर रेसिडेन्सी, सासवड-सोनोरी रोड, ता. पुरंदर, जि. पुणे; मूळ रा. मु. पो. राजाळे, ता. फलटण, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत ५८ वर्षीय शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार दिली होती.याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारानी दि. ६ ऑगस्ट २०२४ रोजी महाडीबीटी पोर्टलवर ट्रॅक्टर खरेदीसाठी शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अनुदान मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. हा अर्ज पुरंदर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या मंडल कृषी अधिकारी अमोल सुतार यांच्याकडे आला होता. अर्जावर साईट व्हिजिट करून अहवाल पुढे पाठविण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र अहवाल पुढे पाठविण्यासाठी सुतार यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. त्यानुसार एसीबीने सापळा रचला असता, तडजोडीनंतर सुतार तीन हजार रुपयांची लाच मागताना निष्पन्न झाला. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजी पाटील, अर्जुन भोसले, पोलिस निरीक्षक शैलजा शिंदे, निरीक्षक आसावरी शेडगे यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×