Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

उपमहापौर परशुराम वाडेकर यांना ‘दि ग्रेट फकीरा’ पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र लहुजी आर्मी व दयाशांती फाउंडेशनतर्फे सन्मान

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र लहुजी आर्मी व दयाशांती फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘दि ग्रेट फकीरा’ पुरस्कार पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांना प्रदान करण्यात आला. ॲड. महेश सकट यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी

या प्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक विशाल सकट व बापू खोडे उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना उपमहापौर परशुराम वाडेकर म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली ‘फकीरा’ ही कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली होती. या कादंबरीत बाबासाहेबांबद्दल लिहिलेले “जग बदल घालुनी घाव, सांगून गेले माझे भिमराव” हे गीत आजही अजरामर आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला असून या पुस्तकाची विक्री लाखोंच्या घरात झाली आहे.

ही कादंबरी दलित, आदिवासी, गोरगरीब तसेच भटके-विमुक्त समाजाच्या जीवनावर आधारित असून ब्रिटिश सत्तेविरोधात दलितांच्या वेदना मांडणारे क्रांतिकारी साहित्य आहे. या कादंबरीतील ‘फकीरा’ या नायकाप्रमाणेच समाजासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे वाडेकर यांनी सांगितले. तसेच या नावाचा पुरस्कार दिल्याबद्दल आयोजकांचे त्यांनी मनापासून आभार मानले.

कार्यक्रमादरम्यान उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना यूपीएससी-एमपीएससी अभ्यासक्रमाची पुस्तके वितरित करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित रणदिवे यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×