Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुण्यातील दिव्यांग बांधवांना मिळणार कृत्रिम अवयव

पुण्यातील दिव्यांग बांधवांना मिळणार कृत्रिम अवयव

चंद्रकांतदादा पाटील यांचा विशेष पुढाकार

marathinews24.com

पुणे – समाजातील दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात नवी उमेद निर्माण करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि तर्क फाऊंडेशन, भारत विकास परिषद, फ्युप्रो, मिशेलिन आणि समुत्कर्ष सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० फेब्रुवारी रोजी मोफत कृत्रिम अवयव वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा – सविस्तर बातमी 

नोव्हेंबर २०२५ मध्ये राबवण्यात आलेल्या तपासणी शिबिरातून निवड झालेल्या पुण्यातील लाभार्थ्यांना या सोहळ्यात प्रत्यक्ष अवयवांचे वाटप केले जाणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींची गतिशीलता वाढवणे आणि त्यांना आत्मसन्मानाने जगण्यास मदत करणे हा आहे.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार मेधाताई कुलकर्णी आणि पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ०४.३० वाजता कोथरुड मधील थरकुडे दवाखाना येथे हा अवयव प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×