Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

Dr Aparna Purohit Pune Lecture : सत्याच्या रक्षणासाठीही झुंज द्यावी लागली-डॉ अपर्णा पुरोहित

Dr Aparna Purohit Pune Lecture

कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या संघर्षाचा प्रवास डॉ. अपर्णा पुरोहित यांनी उलगडला

marathinews24.com

पुणे – Dr Aparna Purohit Pune Lecture : देशकार्याचा वसा घेऊन लष्करात दाखल झालेल्यांना देशाच्या गौरवातच आत्मसन्मान वाटतो.अशा लष्करी अधिकाऱ्याला देशद्रोही ठरवून त्याचा मनोभंग करणे ही त्याच्या दृष्टीने सर्वात अपमानास्पद आणि खचविणारी गोष्ट असते. कर्नल प्रसाद पुरोहित यांना देशद्रोहाच्या आरोपात अडकवून तत्कालीन शासनाने असाच मनोभंग केला मात्र आप्तस्वकीय,समाज आणि लष्कराने दिलेले बळ तसेच ईश्वरी योजनेमुळे या अग्निदिव्यातून आम्ही पार पडलो.आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून वाटचाल केली तर मार्ग सापडतो”असे उदगार डॉ.अपर्णा पुरोहित यांनी काढले.

दुष्काळाच्या सावटात माणुसकीचा दिवा – सविस्तर बातमी 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अरण्येश्वर शाखेच्या वतीने आयोजित “लक्ष्मीकांत जांभोरकर स्मृती” व्याख्यानमालेचे दहावे पुष्प रविवार दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सहकार नगर येथील विद्या विकास विद्यालयातील मैदानावर संपन्न झाले.‘मालेगाव स्फोट – लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीची संघर्षगाथा’ या विषयावरील व्याख्यानात कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या पत्नी डॉ. अपर्णा पुरोहित बोलत होत्या. व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदमावती नगराचे संघचालक अविनाश धोमकर यांची मुख्य उपस्थिती होती.

पती कर्नल प्रसाद पुरोहित हे निस्सीम देशभक्तीच्या भावनेने भारतीय लष्करामध्ये दाखल झाले. पुढे आर्मी इंटेलिजन्स विभागात जबाबदारी असताना त्यांनी बनावट करन्सीचे रॅकेट, मुंबईच्या सागरी क्षेत्रातील धोके अशा अनेक विषयांचा छडा लावला.मालेगाव मध्ये सन २००७ मध्ये बॉम्बस्फोट झाले. त्याचाही अहवाल पुरोहित यांनी सादर केला होता. मात्र वैयक्तिक हितसंबंध जपण्यासाठी लष्करातीलच काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याच मालेगाव स्फोटांमध्ये सहभाग असल्याचा आरोप पुरोहित यांच्यावर ठेवण्यात आला. (Dr Aparna Purohit Pune Lecture) अतिशय सरळमार्गी जीवन जगणाऱ्या पुरोहित कुटुंबावर या घटनेने आपत्तींचा पहाडच कोसळला होता. कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच लष्कराचे नियम पायदळी तुडवून त्यांना कपटाने अटक केली एवढेच नव्हे तर त्यांचा एन्कौटर करण्याचाही प्रयत्न होता.”असे डॉ.अपर्णा यांनी सांगितले.

प्रसाद यांना न्यायालयाने निर्दोष सिद्ध करेपर्यंत लढलो. तत्कालिन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलेल्या अपार सहकार्याच्या स्मृती जागविल्या. त्या कसोटीच्या काळात छोट्या मुलांचे संगोपन, कुटुंबाचा चरितार्थ आणि न्यायाची लढाई एकाच वेळी लढल्याचे वर्णन त्यांनी केले. त्यावेळी व्याख्यानास असलेल्या उपस्थितांची मने हेलावली. या देशात उमर खालिदच्या सुटकेसाठी मोठमोठे मोर्चे निघतात मात्र देशभक्त प्रसाद पुरोहितांकरिता समाज आवाज उठवत नाही, याबद्दल डॉ. पुरोहित यांनी खंत व्यक्त केली. पुणे शहर, पिंपरी चिंचवड सह संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. श्रीकला कानडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘अनादि मी अनंत मी’ हे गीत सादर केले. रजनी वनारसे यांनी सूत्रसंचालन केले. संजीव खळदकर यांनी आभार मानले. ज्येष्ठ गायिका स्वरदा गोडबोले यांनी गायलेल्या संपूर्ण वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×