Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पोलीस बनण्याचे स्वप्न अधूरे; भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू

पोलीस बनण्याचे स्वप्न अधूरे; भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू

१६०० मीटर धावल्यानंतर खाली कोसळला; उपचारादरम्यान तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – पोलीस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून भरतीसाठी धावताना एका ऊसतोड मजुराचा मुलाचा मृत्यू झाला आहे. भरती प्रक्रियेदरम्यान १६०० मीटर धावण्याच्या चाचणीनंतर तरुणाला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिपक भास्कर वाव्हळे (वय-२६, रा. मांडखेल ता. परळी वै. जि. बीड) असे त्याचे नाव आहे.

भुयारी मार्गात टेम्पोच्या धडकेत तरूण ठार – सविस्तर बातमी 

पोलीस भरती प्रक्रियेतील सर्व घटनांचे चित्रीकरण करण्यासाठी पोलीस मुख्यालय बीड परिसरात अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. दिपक वाव्हळे हा तरुण १६०० मीटर धावल्यानंतर खाली कोसळला होता. संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

उमेदवाराने १६०० मीटर धाव पूर्ण केल्यानंतर विश्रांती घेतली. त्यानंतर तो फिनिशिंग पॉईंटलगत असलेल्या मेडिकल रूमकडे चालत जाताना दिसून आला. त्यावेळी मेडिकल टीम त्याच्यासोबत उपस्थित होती. मेडिकल कॅम्पमध्ये डॉक्टरांकडून त्यास प्राथमिक उपचार करण्यात आले. तपासणी दरम्यान नाडी कमी असल्याचे आढळून आल्याने तात्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आली. दुपारी १:१० वा. रुग्णवाहिका मेडिकल कॅम्पमध्ये दाखल झाली. दुपारी १:१४ वा. संबंधित उमेदवारास रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे रवाना केले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. मृत उमेदवाराच्या नातेवाईकांना तात्काळ माहिती देण्यात आलेली असुन पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे अकस्मीत मृत्युची नोंद केली आहे.

उमेदवाराच्या मृत्युचे कारण शविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर समजेल. पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या आरोग्याच्या दृष्टीने मेडिकल टीम, रुग्णवाहिका व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपस्थित ठेवलेल्या आहेत. तथापि, दुर्दैवी मृत्यूबाबत सर्व संबंधित बाबींची तपासणी करण्यात येत आहे. भरती प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी जेवण व पाण्याची व्यवस्था पोलीस मुख्यालयातच केली आहे. सर्व उमेदवारांनी पुरेसा आहार व पुरेसे पाणी प्यावे, आरोग्याची काळजी घ्यावी, अशा सुचना पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिल्या आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×