Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पोलिसचे ओळखपत्र दाखवून ज्येष्ठाची फसवणूक

धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

बीड (अनंत जाधव)- पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवून चोरट्याने तपासणीच्या बहाण्याने ६६ वर्षीय वृद्धाची सोन्याची अंगठी घेऊन फसवणूक केल्याची घटना बीड जिल्ह्यातील धारूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

जबर मारहाण करणाऱ्या आरोपींचा कोर्टाने जामीन फेटाळला – सविस्तर बातमी

धारूर तालुक्यातील रुई येथील रहिवासी असलेले चंद्रकांत गोविंदराव तिडके (वय ६६) हे ७ जानेवारीला दुपारी धारूर येथे कामानिमित्त गेले होते. पायी चालत जात असताना मोटार सायकलवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांना थांबवले. संबंधित तोतयाने त्यांना मी पोलीस खात्यातील अधिकारी असल्याचे सांगून ओळखपत्र दाखवले. गांजाविक्री करणाऱ्या व्यक्तीस पकडल्याचे सांगत तपासणी सुरू असल्याची बतावणी केली.

रस्त्याने जाणाऱ्या ४० वर्षे वयाच्या एका अनोळखी व्यक्तीसही थांबवून त्याच्याकडील वस्तू तपासण्यात आल्या. त्यामुळे तिडके यांचा विश्वास बसला. त्यानंतर अज्ञात इसमाने फिर्यादीस स्वतःकडील वस्तू तपासणीसाठी देण्यास सांगितले. विश्वास ठेऊन तिडके यांनी आपल्या खिशातील डायरी, कागदपत्रे तसेच पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तपासणीसाठी दिली. तपासणी केल्यानंतर संबंधित इसमाने रुमालात गुंडाळलेले साहित्य दाखवले. तुमच्याकडे काही आक्षेपार्ह नाही असे सांगत मोटार सायकलवरून त्याने घटनास्थळावरून पळ काढला. काही वेळाने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. अंदाजे २५ हजार रुपये किमतीची वापरातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी लंपास झाली आहे. अज्ञात व्यक्तीने पोलीस असल्याचे भासवून तपासणीच्या बहाण्याने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दुधाने करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×