Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

जबर मारहाण करणाऱ्या आरोपींचा कोर्टाने जामीन फेटाळला

जबर मारहाण करणाऱ्या आरोपींचा कोर्टाने जामीन फेटाळला

गेवराई तालुक्यातील नादलगाव येथे ६ डिसेंबरला घडली होती घटना

marathinews24.com

बीड  (अनंत जाधव) – गेवराई तालुक्यातील नांदलगाव येथील आदिवासी समाजातील ग्रामपंचायत सेवक जालिंदर सुरवसे याला
घरात बोलावुन जातीवाचक शिवीगाळ करुन गावातील आश्रुबा उत्तम राऊत, गोंविंद सखाराम राऊत, विष्णु आश्रुबा राऊत, भगवान आश्रुबा राऊत, अनिल शिंदे, अनिल ताराचंद राऊत, विमल सखाराम राऊत, अनिता विष्णु राऊत, अविद्या भगवान राऊत, कांताबाई ताराचंद्र राऊत यांनी जातीवाचक शिवीगाळ केली होती.. रक्तबंबाळ होईपर्यंत सुरवसे यांना मारहाण केल्याची घटना ६ डिसेंबरला घडली होती. लाथा – बुक्यासह लोखंडी रॉड, वायर, काठ्यांने मारहाण केली होती. तसेच महिलांनी तोंडाला काळे लावले व चपलाने तोंडावर, पाठीवर मारहाण केली.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम 37 (1) व (3) आदेश जारी – सविस्तर बातमी 

मारहाणीमध्ये सुरवसेचे हात पाय फॅक्चर झाले होते . त्यास जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.वरील लोक मारहाण करते वेळी म्हणत होते की, याला कोणी त्याचे नातेवाईक सोडावयाला आले तर, त्यांचा पाय काढु, पिडीताची बहिण व आई तलवडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता, पोलीसांनी राजकीय दबावापोटी तक्रार नोंदवुन न घेता बाहेर काढले होते . तलवडा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उशिरा तक्रार नोंदवुन आरोपी विरुद्ध बी.एन.एस. कलम ११९ (१), ११८ (२), ११८ (१), ११५ (२), १८९ (२),१८९ (४), १९१ (२), १९१ (३), १९० आणि अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९, ३(१) (एस), ३(२) आर,३ (२)(व्हीए) अन्वये गुन्ह्याची नोंद केली.या गुन्ह्याच्या विरुद्ध अनिल आश्रुबा राऊत, अनिल ताराचंद राऊत, विमल सखाराम राऊत, अनिता विष्णु राऊत, आविद्या भगवान राऊत व कांताबाई ताराचंद राऊत यांनी अटकपुर्वक जामीनासाठी क्रिमिनल जामीन अर्ज १२४४, १२४५ आणि १२६० अन्वये बीड जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या आरोपीच्या जामीन अर्जाकडे संपुर्ण गेवराई तालुक्याचे लक्ष लागलेले होते. फिर्यादीचे वकील तर्फे ऍड गोरक्ष खेडकर, ऍड. सुनिल बळवंते यांनी फिर्यादीच्या वतीने जोरदार युक्तीवाद केला.

सरकारी वकील ऍड अजय राख यांनी शासनातर्फे युक्तीवाद केला. फिर्यादीचा व सरकारी वकिलांचा युक्तीवाद अतिरीक्त सत्र न्यायाधिश बीड यांनी ग्राह्य धरुन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे . मात्र याप्रकरणातील आरोपी अद्यापही पोलिसांच्या अशिर्वादाने मोकाट आहेत. पोलीस प्रशासन राजकीय दबावापोटी आरोपी अटक करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कारकिर्दीवर असा प्रश्न उपस्थित होत की पोलीस प्रशासनच अटक करण्याऐवजी गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना सहकार्य करत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×