Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

दागिने पाॅलीशच्या बतावणीने ज्येष्ठ महिलेची फसवणूक

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – दागिने पाॅलीश करून देण्याच्या बतावणीने चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेकडील १ लाख ८० हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना दांडेकर पूल परिसरात घडली. चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका Stomach महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कात्रज, मांजरी भागात घरफोडी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला दांडेकर पूल परिसरात राहायला आहेत. त्या रविवारी (२१ डिसेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास दांडेकर पूल परिसरातून निघाल्या होत्या. जय महाराष्ट्र मंडळाजवळ तीन चोरट्यांनी त्यांना अडवले आणि दागिने पाॅलीश करुन देण्याची बतावणी केली. चोरट्यांनी त्यांच्याकडील एक पितळ्याच्या वस्तूवर द्रवपदार्थ ओतला. पितळ्याची वस्तू चमकायला लागली. ज्येष्ठ महिलेकडील सोन्याच्या दोन बांगड्या चोरट्यांनी मागितल्या. पाॅलीश करण्याचा बहाणा करुन चोरटे १ लाख ८० हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या लांबवून पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक महाले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×