Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

सुप्रसिद्ध दामले दाम्पत्याला यशवंत-वेणू पुरस्कार

दिलीप प्रभावळकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने होणार गौरव

marathinews24.com

पुणे – सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले आणि गौरी प्रशांत दामले यांना यशवंत-वेणू पुरस्काराने गौरविले जाणार आहे. तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार (दि. 25) नोव्हेंबरला सायंकाळी साडे चार वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे आयोजित केल्याची माहिती नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, सत्यजीत धांडेकर, समीर हंपी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ – सविस्तर बातमी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोथरूड शाखेचा वर्धापन दिन तसेच यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन यानिमित्त आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून यशवंत-वेणू पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते होणार आहे. पुणे महापालिकेच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कुटुंब कीर्तन (सर्वोत्कृष्ट नाटक), ठकीशी संवाद (सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक), दोन वाजून बावीस मिनिटांनी (विशेष लक्षवेधी नाटक) तसेच संदेश कुलकर्णी (सर्वोत्कृष्ट लेखक), विजय केंकरे (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक), संकर्षण कऱ्हाडे (सर्वोत्कृष्ट अभिनेता), शुभांगी गोखले (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री), दत्ता शिंदे (पडद्यामागील कलाकार) यांचा यशवंत सन्मानाने गौरव केला जाणार आहे.

माजी कृषीमंत्री शशिकांत सुतार, शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार तसेच महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., नवनीत कौर, ओमप्रकाश दिवटे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‌‘धुंदी कळ्यांनो.. धुंदी फुलांनो‌’ हा सदाबहार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून अजित परब आणि मनिषा निश्चल गीते सादर करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×