Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

पुण्यात रूपरंगी जुगलबंदीत रसिक मंत्रमुग्ध

पुण्यात रूपरंगी जुगलबंदीत रसिक मंत्रमुग्ध

विद्यार्थ्यांचां बासरी वादन यातून गुरुपौर्णिमेचा अविस्मरणीय रंगला सोहोळा

marathinews24.com

पुणे – सुप्रसिद्ध बासरी वादक गुरू पंडित रूपक कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेली बासरी वादनातील अनोखी रूपरंगी जुगलबंदी, कोलकातामधील गायक पंडित शुभोमोय भट्टाचार्य यांनी सादर केलेले मल्हार रागातील अप्रचलित प्रकार आणि ब्लिसफुल विंड्‌स फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांचे बासरी वादन यातून गुरुपौर्णिमेचा अविस्मरणीय सोहोळा रंगला.

मनोहारी नृत्याविष्काराने रंगले कथकचे ‘आवर्तन’ – सविस्तर बातमी 

रूपक कुलकर्णी म्युझिक फाऊंडेशन आणि ब्लिसफुल विंड्‌स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवाचे. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात शुक्रवारी (दि. २२ ऑगस्ट) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.एकाच बासरी वादकाने दोन तबला वादकांच्या साथीने केलेले वादन, त्यात दोन स्वतंत्र राग आणि दोन वेगळे ताल यांच्या माध्यामातून रंगत गेलेली सूर-तालाची अनोखी जुगलबंदी कार्यक्रमाचा कळसाध्याय ठरली.

रूपरंग जुगलबंदीत पंडित रूपक कुलकर्णी यांना ज्येष्ठ तबलावादक पंडित मुकुंदराज देव आणि त्यांचे पुत्र रोहित देव यांनी समर्पक साथ करत कार्यक्रमाची रंगत वाढविली. पंडित रूपक कुलकर्णी यांच्या अनोख्या संकल्पनेतून ही रूपरंगी जुगलबंदी सादर झाली. त्यांनी भूपाली रागातील रूपक ताल आणि यमन रागतील मत्तताल ऐकविताना केलेले सुमधुर बासरी वादन रसिकांना संमोहित करणारे ठरले. त्यांनतर दोन्ही तबला वादकांच्या साथीने शुद्धकल्याण राग सादर करून रसिकांना स्वरवर्षावात चिंब केले. कार्यक्रमाची सांगता बासरी वादनातील मैहर घराण्याचे वैशिष्ट्य असणाऱ्या मांझ खमाज या रागाच्या सादरीकरणाने झाली.

निसर्गात बरसत असणाऱ्या श्रावण धारा आणि त्याचवेळी रंगमंचावर बरसत असणारे बासरीचे स्वर आणि दोन तबलजींच्या तबल्यातून उमटणारे बोल यांच्या अनोखा संगमातून रसिकांना सूरांच्या अवकाशात विहरत ठेवले. मृगेंद्र मोहाडकर, आदित्य सुतार यांनी सहवादन केले. कोलकाता येथील सुप्रसिद्ध गायक शुभोमोय भट्टाचार्य यांनी मैफलीची सुरुवात राग गौड मल्हारमधील ‘तोरे मुख चंद्र’ या पारंपरिक बंदिशीने केली. त्याला जोडून द्रुतलयीतील ‘कारे पिरे बदरवा छाए’ ही बंदिश सादर करून ‘तानाना दिर दिर ताना’ हा तराणा बहारदारपणे सादर केला.

मल्हार रागातील अभावानेच सादर होणारे अप्रचलित प्रकार ऐकविताना पंडित शुभोमोय भट्टाचार्य यांनी खमाज आणि मल्हार रागांचे मिश्रण असणाऱ्या खमाजी मल्हारमधील ‘रिमझिम रुमझुम बरसे बदरा’ ही बंदिश सादर केली. धूंधिया मल्हार हा अनोखा राग सादर करताना ‘बिजुरी चमके, बदरा गरजे’ ही बंदिश तर बिरजू की मल्हारमधील ‘जंगल बिच बोले मुरवा’ या पारंपरिक बंदिशी ऐकविल्या. त्यांना दिपिन दास (तबला), नचिकेत हरिदास (संवादिनी) यांनी साथसंगत केली.

सुरुवातीस मृगेंद्र मोहाडकर यांच्या ६० शिष्यांचे बासरीवादन झाले. यात आठ वर्षे वयाच्या शिष्यांपासून साठ वर्षे वयाच्या शिष्यांचा सहभाग होता. कलाकरांचा सन्मान पंडित रूपक कुलकर्णी, मृगेंद्र मोहाडकर यांनी केला तर सूत्रसंचालन रजत जोशी यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×