“तुला पाहताना” कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध
marathinews24.com
पुणे – पोॲड्स क्रिअशन आणि ख्यातनाम संगीतकार केदार अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केलेल्या निवडक रचनांचा आगळा वेगळा पण बहारदार “तुला पाहताना” गीतांचा कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात पार पडला. भक्तिगीत, भावगीत आणि गझल यांचा अनोखा संगम असलेली नवी कोरी करकरीत गाणी जेष्ठ तसेच नवोदित गायकांनी उत्कृष्ट सादर केली.
या प्रयोगात स्वतः संगीतकार केदार गणेश अभ्यंकर यांच्या समवेत किशोर,नरेंद्र, वैशाली, हर्षदा, दीप्ती, गौरी यांनी नवीन गाणी प्रभावीपणे सादर केली. साथसंगत पुण्यातील वृंदा, मिलिंद व विनय अमरावतीचे हरीष, नागपूरचे आर्य आणि अखील यांनी उत्कृष्टपणे केली.

पुणे यवतमाळ, चिमूर, नागपूर अशा विविध ठिकाणी दहा प्रयोग केल्यानंतर “तुला पाहताना…. हा १० वा कार्यक्रम उत्सवाहात पार पडला. कार्यक्रमाच्या निर्मात्या विजया म्हणाल्या की तुला पाहताना…. दहावा प्रयोग आमच्या साठी मैलाचा दगड आहे. हाच अनुभव गाठीशी घेऊन तसेच प्रेक्षकांच्या प्रोत्साहनाने आम्ही या नवनवीन गाण्यांचे १०१ प्रयोग करण्याचे स्वप्न बघत आहोत. दहाव्या प्रयोगात रसिकांनी देखील भरभरून दाद दिली. क्षिती करंदिकर हिने एका गवळणीवर अप्रतिम नृत्याविष्कार सादर केला .




















