Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

अखेर नीलेश चव्हाणला पोलिसांच्या ताब्यात

अखेर नीलेश चव्हाणला पोलिसांच्या ताब्यात

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळ बोर्डरवरून घेतले ताब्यात

marathinews24.com

पुणे – सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाण याला अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळमधून ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून १० दिवस तो पोलिसांना चकवा देत होता. मात्र, तो नेपाळ बॉर्डरमार्गे दुसर्‍या देशात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी दि. ३० दुपारच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले असून, ट्रान्झिस्ट रिमांडद्वारे त्याला पुण्यात आणले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ऑनलाईन टास्क पडले ४४ लाखांना, तरूणीला गंडा – सविस्तर बातमी 

अखेर नीलेश चव्हाणला पोलिसांच्या ताब्यात

हुंड्यासह इतर अनेक कारणामुळे वैष्णवी हगवणे हिने राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यामुळे संपुर्ण राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यापार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी पती, दीर, सासू, सासरा, नणंदेला अटक केली होती. मात्र, याप्रकरणातील आरोपी नीलेश चव्हाण पसार झाला होता. त्याच्या शोधार्थ पिंपरी-चिंचवड पोलिसांची ६ पथके दिवसरात्र मेहनत घेत होती. अखेर तो नेपाळमार्गे परदेशात पळून जाण्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने शुक्रवारी दि. ३० सकाळपासूनच बॉर्डरवर सापळा रचला होता. त्यावेळी आलेल्या नीलेश चव्हाण याला पथकाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आरोपी नीलेश चव्हाण याच्यावर वैष्णवीच्या मुलाचा छळ केल्याचा आरोप आहे.

आरोपी निलेश चव्हाण याने वैष्णवी हिच्या वडिलांना धमकावल्याचा आरोप आहे. त्याने वैष्णवीच्या बाळाच्या ताब्यासाठी गेलेल्या कुटुंबाला बंदूक दाखवून धमकावले होते. याप्रकरणात त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याला भारतात आणून पुढील चौकशीसाठी न्यायालयात हजर केले आहे. याप्रकरणात आणखी काही आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, शनिवारी दि.३१ सकाळच्या सुमारास आरोपी चव्हाणला पुण्यात आणले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×