Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारवाईत साडेआठ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारवाईत साडेआठ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल

वाहतूक सुरक्षाविषयक नियमांचे पालन करण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

marathinews24.com

बारामती –  बारामती तालुक्यात वाहतूक सुरक्षाविषयक नियमांच्या अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत २७ ते ३० जुलै २०२५ या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत साडेआठ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आलेला आहे.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत वाहनमालक वा वाहनचालकांकडून वाहतूक सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल विविध ५५ प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजन भरल्याबद्दल (ओव्हलोड) १७ प्रकरणात ७ लाख ७२ हजार रुपये, योग्यता प्रमाणपत्र नसन्याच्या अनुषंगाने ७ प्रकरणात १४ हजार, विमा प्रमाणपत्राच्या ३ प्रकरणात ४ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले आहेत.

भारती विद्यापीठ ‘आयएमईडीमध्ये बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम – सविस्तर बातमी 

नोंदणी क्रमांकाच्या अनुषंगाने २ प्रकरणात २ हजार रुपये, परावर्तिका लावली नसणे या अनुषंगाने ३ प्रकरणात ३ हजार रुपये, काळी काच असलेल्या २ वाहनांकडून १० हजार ५००, वाहन कर न भरलेली २ वाहनांकडून २ हजार, प्रदूषण प्रमाणपत्र नसलेल्या 6 प्रकरणात ४ हजार ५००, अनुज्ञप्ती नसलेल्या १० वाहनचालकांकडून ५ हजार रुपये तसेच शालेय विद्यार्थी वाहतूक बसच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या ३ प्रकरणात ४२ हजार रुपये असा एकूण ८ लाख ५९ हजार ५०० रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत मोहीमस्तरावर वाहनांची तपासणीचे काम सुरु आहे. नागरिक तसेच शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांना वाहनचालकांनी वाहतूक सुरक्षाविषयक नियमाचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×