Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर परिसरात अग्नितांडव

मध्यवर्ती बुधवार पेठेत आगीची घटना

Marathinews24.com

पुणे – मध्यवर्ती दगडूशेठ गणपती मंदिरालगत असलेल्या दत्त मंदिरापाशी मोठी आग लागल्याची घटना बुधवारी मध्यरात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले आहे. घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी धाव घेतली असून, परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनीही गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्यासाठी जवानांकडून काम केले जात होते. बुधवार पेठ, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराशेजारी आगीची घटना घडली आहे. अग्निशमन दलाकडून 6 वाहने दाखल झाली असून, विझवण्याचे काम सुरु केले आहे.

दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सज्जाद गुल – सविस्तर बातमी

अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीनजीक दत्त मंदिराच्या पाठीमागे एका मोकळ्या जागेतील असलेल्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे.आग लागल्याची वर्दी मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केले. घटनास्थळी स्थानिक पोलिसांनीही धाव घेतली असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करीत आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकले नसल्याची माहिती जवानांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×