Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

ओढे – नाल्यांचा प्रवाह रोखल्यामुळेच हिंजवडीत पूरस्थिती

ओढे - नाल्यांचा प्रवाह रोखल्यामुळेच हिंजवडीत पूरस्थिती

संबंधितांवर होणार कारवाई

marathinews24.com

पिंपरी – हिंजवडी फेज – १, २ आणि ३ तसेच मेट्रो मार्गासह परिसरात नियमांचा भंग करून ओढे – नाल्यांचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह रोखल्यामुळेच पूर परिस्थिती निर्माण होत आहे. पीएमआरडीएसह एमआयडीसी हद्दीतील १३ ठिकाणी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह परस्पर बदल तसेच रोखणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भात पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी नुकतीच लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक घेत संबंधितावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.

आळंदी नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता मोहिमेस गती अलंकापुरी सुनीसुनी – सविस्तर बातमी 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह एमआयडीसी हद्दीतील ओढे – नाल्यांचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह काही कंपन्या, बिल्डर आणि नागरिकांनी परस्पर रोखला तसेच स्थलांतरित केला आहे. काही ठिकाणी मनमर्जीप्रमाणे बांधकामे करण्यात आल्याचे पुढे येत असून संबंधित बांधकामे थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासह प्रशासनाला सहकार्य न करणाऱ्या तसेच नियमबाह्य पद्धतीने बांधकामे करणाऱ्यांवर थेट गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया आगामी काही दिवसात करण्यात येणार आहे.

हिंजवडीसह परिसरात पावसाचे पाणी साचत असल्याने पाण्याचा निचरा रस्ते दुरुस्तीसह नागरी सोयी सुविधांच्या अनुषंगाने बहुतांश कामे प्रशासकीय यंत्रणेमार्फत करण्यात आली आहे. हिंजवडी आयटी पार्क क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीसह मेट्रो मार्गिकेलगतचा राडारोडा हटवणे, गटार व नालेसफाई, खड्डे बुजवणे, अनधिकृत स्टॉल हटवणे यासह इतर आवश्यक ती कामे पूर्ण झाल्याने नागरी समस्या निश्चितच सुटणार आहे. यासह पीएमआरडीए आणि एमआयडीसी हद्दीतील नैसर्गिक ओढे – नाल्यांतील पाण्याचा प्रवाह परस्पर रोखला तसेच स्थलांतरित करण्यात आला, अशी १३ ठिकाणे शोधण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांनी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह खुला करावा, अन्यथा त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

या भागात रोखण्यात आला ओढ्या नाल्यांचा प्रवाह

१) ग्लोबल सेझ टेक पार्कजवळ, भोईरवाडी
२) टाटा कन्सल्टन्सीजवळ, भोईरवाडी
३) मेट्रो पोलिस मेट्रो स्टेशनजवळ, मान
४) माण देवी मंदिर -१ मान
५) माण देवी मंदिर, ग्रामपंचायत
६) स्मशान भूमी, मान
७) टेक महिंद्रा आयटी पार्कजवळ, मान
८) क्वाड्रॉन मेट्रो स्टेशन वन विभागाच्या जागेलगत, मान
९) गट नं. २८६ जवळ, मान
१०) गट नं. २८६ जवळ, मान
११) गट नं. २८१ जवळ, मान
१२) गट नं. २७९ जवळ, मान
१३) गट नं. २७१, २७२, २७३ जवळ, मान

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×