Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पंतंग उडवणे आले मुलाच्या जीवाशी

पंतंग उडवणे आले मुलाच्या जीवाशी

काळेपडळमध्ये रेल्‍वेच्‍या धडकेत मुलगा ठार

marathinews24.com

पुणे – पतंग उडवण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ११ वर्षीय मुलाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महंमदवाडी बोगद्याजवळ रेल्वे रुळावर भीषण दुर्घटना घडली आहे. काळेपडळ पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

चिप्सच्‍या डब्याच्‍या नावाखाली गांजाची तस्‍करी – सविस्तर बातमी  

प्रकाश डबले भुल (वय ११, गीत गंधर्व सोसायटी, ससाणेनगर मूळ नेपाळ) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. तो ससाणे नगरमधील गीतगंधर्व सोसायटीत कुटुंबासमवेत वास्तव्यास होता. बुधवारी (दि.१०) सायंकाळी तो पतंग उडवण्यासाठी घराबाहेर गेला होता. मात्र उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता.

गुरुवारी (दि११) सकाळी साडेसातच्या सुमारास ट्रॅकमन प्रमोद सक्सेना यांना महंमदवाडी बोगद्याजवळ दोन रेल्वे रुळांच्या मधोमध एका मुलाचा मृतदेह आढळला. त्यांनी तात्काळ काळेपडळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात रेल्‍वेच्‍या धडकेत त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचे आढळले. घटनेत कोणताही संशयास्पद प्रकार नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×