Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

चिप्सच्‍या डब्याच्‍या नावाखाली गांजाची तस्‍करी

चिप्सच्‍या डब्याच्‍या नावाखाली गांजाची तस्‍करी

७२ लाखांचा हाड्रोपोनिक गांजा जप्‍त

marathinews24.com

पुणे – आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या (कस्‍टम) एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययू) केलेल्या कारवाईत गांजा तस्करीची आणखी एक क्लुप्ती उघडकीस आणली आहे. चिप्ससारखे दिसणाऱ्या दोन बंद डब्यांमध्ये तब्बल ७१ लाख २० हजार रुपये किमतीचा हायड्रोपोनीक गांजा लपवून नेण्याचा महिलेचा प्रयत्न फोल ठरला. याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे.

अल्‍पवयीन मुलींचे अपहरण करणाऱ्या दोघांना बेड्या – सविस्तर बातमी 

कस्‍टम विभागाने दिलेल्‍या माहितीनुसार, ही घटना दि. ६ डिसेंबरला घडली. एअर इंडिया एक्सप्रेसच्या आयएक्स–२४१ या विमानातून आलेल्या एका महिला प्रवाशावर एआययूने मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे लक्ष ठेवले होते. तिच्या हालचाली संशयास्पद वाटताच अधिकाऱ्यांनी सामानाची सुक्ष्म तपासणी केली. या तपासणीत दोन बंद सिलेंडराच्या आकाराच्या डब्यांमध्ये पॅक केलेला ७२२ ग्रॅम हायड्रोपोनीक गांजा आढळला. डबे बाहेरून चिप्सचे चित्र लावून आकर्षक पद्धतीने पॅक केले होते, त्यामुळे ते खाद्यपदार्थ असल्याचा भास होत होता. मात्र, एआययूच्या दक्षतेमुळे तस्करीचा डाव हाणून पाडला गेला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची काळ्या बाजारातील किंमत तब्बल ७२ लाख २० हजार रुपये इतकी आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महिलेला ताब्यात घेऊन एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा माल कुठून आणला गेला आणि कोणाकडे पाठवण्याचा प्रयत्न होता, याचा तपास सुरू आहे. विमानतळावरून अमली पदार्थांची तस्करी विविध क्लुप्त्या वापरून करण्यात येते. मात्र, एअर इंटेलिजन्स युनिटच्या सततच्या सतर्कतेमुळे अशा प्रयत्नांना पुन्हा एकदा आळा बसला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×