अल्‍पवयीन मुलींचे अपहरण करणाऱ्या दोघांना बेड्या

अल्‍पवयीन मुलींचे अपहरण करणाऱ्या दोघांना बेड्या

काळेपडळ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शहरातील दोन अल्‍पवयीन मुलीचे अपहरण करून त्‍यांना राजस्‍थान येथे नेणाऱ्या दोघांना काळेपडळ पोलिसांनी राजस्‍थान येथून बेड्या ठोकल्‍या. सुरेशकुमार वडदाराम प्रजापती (वय २१, रा. राणी, राजस्‍थान) आणि सुरेशकुमार मोहनलाल राणाभील (वय ३१ राणी, राजस्‍थान) अशी अटक करण्यात आलेल्‍या दोघांची नावे आहेत. काळेपडळ पोलिस ठाण्यात दोन अल्‍पवयीन मुलींचे अपहरण झाल्‍याचा गुन्‍हा दाखल करण्यात आला होता.

मोक्‍कातील फरार आरोपीला बेड्या – सविस्तर बातमी 

मोबाईल क्रमांकाच्‍या तांत्रिक विश्लेषण करून तपासासाठी दोन टिम रवाना करण्यात आल्‍या. अल्‍पवयीन मुलींचा व संशयीत आरोपींचा वापी, सुरत, अहमदाबाद, फालना, शिवगंज, वाकली, अंदुर, सादरी, मारवाड, जंक्‍शन, राणी पाली, जोधपुर राजस्‍थान येथे ३ हजार ३०० किलोमीटरचा प्रवास करून आजु बाजुच्‍या परिसरात शोध घेतला. त्‍यातील एक मुलगी राजस्‍थान येथील राणी तालुक्‍यात सापडली. तर दुसरी मुलगी राजस्‍थान येथील पाली जिल्‍ह्यात सापडली.

दोन मुलींची सुटका करत त्‍यांना फुस लावुन पळवून नेणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलिस निरीक्षक गुन्‍हे अमर काळंगे, सहायक पोलिस निरीक्षक अजय हंचाटे, पोलिस अमंलदार शाहीद शेख, महादेव शिंदे, युनिट पाचचे पोलिस अमंलदार शशिकांत नाळे, गणेश माने यांच्‍या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×