Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची भेट

 भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची भेट

स्मारकाचे काम दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना

marathinews24.com

पुणे –  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केलेल्या ऐतिहासिक भिडेवाडा येथे उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्मारकाला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज भेट देऊन कामाची पाहणी केली.

कोयना धरण “छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ नावाने ओळखले जाणार – सविस्तर बातमी 

स्मारकाच्या उभारणीची प्रगती, वास्तुरचना आणि संवर्धनाच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी स्मारकाच्या कामाची सद्यस्थिती, विविध टप्प्यांतील प्रगती तसेच पुढील नियोजनाची माहिती मंत्री भुजबळ यांना दिली.

भिडेवाडा हे भारतीय समाजसुधारणेच्या आणि स्त्रीशिक्षणाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे प्रेरणास्थान असल्याने स्मारकाचे काम ऐतिहासिक वारशाचे जतन करत दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

या प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (इस्टेट) प्रजित नायर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता बिपीन शिंदे, सार्वजनिक बांधकाम (इलेक्ट्रिकल) विभागाचे मुख्य अभियंता मनीषा शेकटकर, वास्तुविशारद धनंजय साळकर, उपायुक्त अविनाश सकपाळ, उपायुक्त माधव जगताप, उपायुक्त तुषार बाबर उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×